जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहराचे अधिकृत उमेदवार डॉ.अनुज पाटील यांच्या प्रचाराचा नारळ शाहूनगर येथील तपस्वी हनुमान मंदिरात वाढवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ऍड. जयप्रकाश बाविस्कर यांनी शुभारंभ केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ.अनुज पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला जळगावकरांचा प्रतिसाद मिळाला. प्रत्येक गल्ली, वाडी, वस्तीतील नागरिकांच्या भेटी घेऊन समस्यांबाबत चर्चा केली. प्रचारादरम्यान ज्येष्ठ नागरिक, माता भगिनी यांच्याकडून त्यांनी आशीर्वाद घेतले.
प्रचार दौरा शाहू नगर, जे.डी.सी.सी. बँक कॉलनी, पोलीस परेड ग्राउंड, प्रताप नगर, गिरणा वसाहत, इंडिया गॅरेज परिसर, तुकाराम वाडी, जानकी नगर, गणेश वाडी, भास्कर मार्केट पोलीस मुख्यालय, गणेश नगर, दंगल ग्रस्त कॉलनी या परिसरात झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर विश्वास दाखवणारे नागरिक आपले बांधव आहेत, आणि त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढणे ही आपली जबाबदारी आहे. बदलाची नवी सकाळ आणण्यासाठी जनतेने दाखवलेला हा भरघोस प्रतिसाद आमचं बळ आहे. ही लढाई केवळ निवडणुकीची नसून एका नव्या युगाच्या उभारणीसाठीची आहे असे प्रतिपादन डॉ. अनुज पाटील यांनी केले.
यावेळी मनसेचे नेते ऍड. जयप्रकाश बाविस्कर, जिल्हाध्यक्ष ऍड. जमील देशपांडे, महानगरअध्यक्ष किरण तळले, उपमहानगर अध्यक्ष सतीश सैंदाणे, चेतन पवार, राजेंद्र निकम, श्रीकृष्ण मेंगळे, विद्यार्थी सेनेचे योगेश पाटील, साजन पाटील, जितेंद्र पाटील, ललित शर्मा, आशुतोष जाधव, डॉ.महेंद्र पाटील पुणे, यशस्वी पाटील पुणे, रेखा पाटील रावेर, डॉ. दिगंबर पाटील रावेर, प्रकाश पाटील, उमरखेडा डॉ. लीना पाटील, डॉ. के. डी. पाटील, डॉ. अभिजीत पाटील, डॉ. अजय सोनवणे, कुणाल पाटील, डॉ.क्सिद्धार्थ पाटील रावेर, डॉ. मोसमी पाटील, हितेश पाटील, शरीफ खान, राहुल पाटील, सागर पाटील, प्रवेझ शाह, अर्जुन साळुंखे यांच्यासह डॉक्टर पाटील यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.
VIDEO