• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळके-विटनेर परिसरात गुलाबराव पाटील यांना जनतेचा भक्कम पाठिंबा

वडली येथे घोड्यावरून मिरवणूक : भजनी मंडळ व शेतकऱ्यांनी केले भव्य स्वागत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 5, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळके-विटनेर परिसरात गुलाबराव पाटील यांना जनतेचा भक्कम पाठिंबा

जळगाव, (प्रतिनिधी) : जळके – विटनेर परिसरात महायुतीचे उमेदवार आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांना जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वात परिसरातील रस्ते, पूल, सिंचन बंधारे, पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत कार्यालयांच्या इमारती, जळके येथे वीज उपकेंद्राच्या क्षमतेत वाढ आणि इतर विविध विकास कामे पार पडली आहेत. ग्रामस्थांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, परिसराच्या उर्वरित विकासासाठी कटिबद्ध आहे. गावांमध्ये विविध विकास कामे केल्याने गुलाबराव पाटील यांना जळके-विटनेर परिसरात त्यांना जनतेचा भक्कम पाठिंबा लाभत आहे. विशेषतः मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेअंतर्गत आयोध्या दर्शनावरून परतलेल्या ६० जेष्ठ भाविकांनी व भजनी मंडळानी दिंडी काढून गुलाबराव पाटील यांचे स्वागत केले आणि त्यांना आशीर्वाद दिला.

गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे जळके येथे वीज उपकेंद्राची क्षमता वाढवण्यात आली आहे. तसेच, विटनेर येथे सौर उर्जेच्या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी विशेष योजना सुरू करून ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यांनी परिसरातील शेती रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करून शेतकरी वर्गाला सहज वाहतुकीची सोय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

वडली येथे घोड्यावरून मिरवणूक..
वडली गावात महायुतीचे उमेदवार गुलाबराव पाटील यांचे घोड्यावरून भव्य मिरवणुकीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्थानिक जनतेच्या उत्साहात भरभरून सहभाग दिसला, ज्यामध्ये ढोल-ताशांचा गजर आणि पारंपरिक वेशभूषेतील स्वागत सोहळा पाहायला मिळाला.

यांची होती उपस्थिती..
भाजपाचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, मा. जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, चंद्रशेखर पाटील, दुध संघाचे रमेशआप्पा पाटील, महिला समन्वयक शितलताई चिंचोरे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, राजेंद्र चव्हाण, तालुकाध्यक्ष हर्शल चौधरी, जळके, विटनेर लोणवाडी, सुभाषवाडी, पाथरी, वसंतवाडी , वराड येथील अनुक्रमे सरपंच राजू भैय्या पाटील, ललित साठे, जयश्री राठोड, अर्जुन शिरसाट, विनोद पाटील, राजाराम राठोड, आदी सरपंच तसेच साहेबराव वराडे, सचिन पाटील, डंपी सोनवणे, श्याम परदेशी, सागर परदेशी, सुरेश गोलांडे, रवी चव्हाण, संदीप सुरळकर, विकास जाधव, धोंडू जगताप, पी.के. पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, गोकुळ राठोड, सरीचंद राठोड, उखर्डू राठोड, अनिता चिमणकारे, मंगला गोपाळ, सुनील ब्राम्हणे, विजय जाधव रविंद्र पाटील, पंकज जाधव यांच्यासह महिला, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड संख्येने उपस्थित होते.


 

Tags: #political
Next Post
डॉ.अनुज पाटील यांचा प्रचार सुरू ; शहरातील डॉक्टरांचा सहभाग..

डॉ.अनुज पाटील यांचा प्रचार सुरू ; शहरातील डॉक्टरांचा सहभाग..

ताज्या बातम्या

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
गुन्हे

पाळधी बायपासवर कंटेनर उलटला; दोनगावच्या महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

September 9, 2026
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक
गुन्हे

तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची सोशल मीडियावर बनावट अकाउंटद्वारे बदनामी ; नशिराबादच्या होमगार्डला अटक

September 9, 2026
अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा
जळगाव जिल्हा

अनुभूती बाल निकेतन व विद्या निकेतनमध्ये सर्जनशील गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा

September 9, 2026
७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला
गुन्हे

७०० रुपयांची मागणी, २०० रुपयांवर तडजोड; भूकरमापक पुन्हा लाच घेताना पकडला

September 9, 2026
जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या
गुन्हे

जळगाव जिल्हा पोलिस दलात फेरबदल; तीन पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्या

September 9, 2026
देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त
गुन्हे

देवझिरीत तुरीच्या शेतात गांजाची लागवड; १७५ झाडे जप्त

September 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add