• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मनुदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा अपघात ; तिघांचा मृत्यू

यावल-चोपडा रोडवरील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 8, 2024
in जळगाव जिल्हा
0
मनुदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांचा अपघात ; तिघांचा मृत्यू

चोपडा, (प्रतिनिधी) : तालुक्यातील सातपुड्यात वसलेल्या मनुदेवीचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. यावल- चोपडा रस्त्यावर कारचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात धुळे जिल्ह्यातील निजामपूर येथील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. तर कारचालक गंभीर जखमी असून चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

धुळ्याच्या साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वाणी कुटुंब हे यावल तालुक्यातील सातपुडा निवासिनी मनुदेवी याठिकाणी नवरात्रीमध्ये दरवर्षी भंडारा देत असतात. त्यानुसार नवरात्री सुरु असल्याने ठरल्याप्रमाणे मंगळवारी ८ ऑक्टोंबर ला सकाळी वाणी कुटुंबातील शैलेश श्रीधर वाणी (वय ३४), निलेश श्रीधर वाणी (३०) हे दोन भाऊ आणि त्यांच्या सोबत जितेंद्र मुरलीधर भोकरे (वय ४७) हे कारने मनुदेवी येथे भंडारा देण्यासाठी सकाळी मार्गस्थ झाले होते. (केपी)मात्र मनुदेवी मंदिर काही किलोमीटर अंतरावर असतानाच त्यांच्या कारचा अपघात झाला.

या भीषण अपघातात वाणी बंधूसह जितेंद्र भोकरे हे तिघे जागीच मृत्युमुखी पडले तर चालक गंभीर जखमी झाला असून त्याला चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (केपी) अपघाची माहिती मिळतात यावल पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.


 

Tags: accident
Next Post
महिलेची सोन्याची पोत लंपास ; एकाला अटक

महिलेची सोन्याची पोत लंपास ; एकाला अटक

ताज्या बातम्या

चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड
Uncategorized

चारा टंचाईवर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा : डॉ. प्रदीप झोड

November 1, 2026
पत्रकारितेचा पाया मूल्यांवरच; बदलत्या प्रवाहात नैतिकतेची जपणूक आवश्यक!
जळगाव जिल्हा

पत्रकारितेचा पाया मूल्यांवरच; बदलत्या प्रवाहात नैतिकतेची जपणूक आवश्यक!

November 1, 2026
रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
गुन्हे

भडगाव पोलीस लाईन परिसरातून २० लाखांचा डंपर चोरीला

November 1, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

अल्पवयीन पत्नीने बालिकेला जन्म दिल्यानंतर पतीविरुद्ध गुन्हा दाखल

November 1, 2026
भोकर स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली मात्र अवघ्या दोन तासांत चौघांना मुद्देमालासह अटक
गुन्हे

भोकर स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा; ३५ कोटींचे सोने, १५ लाखांची रोकड लुटली मात्र अवघ्या दोन तासांत चौघांना मुद्देमालासह अटक

November 1, 2026
महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ
जळगाव जिल्हा

महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी; अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

November 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add