• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

“झेंडूचं फुल” नाटकाला जळगावकरांचा उदंड प्रतिसाद

आ. राजूमामा भोळे यांच्यातर्फे आयोजन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 29, 2024
in जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
“झेंडूचं फुल” नाटकाला जळगावकरांचा उदंड प्रतिसाद

जळगाव, (प्रतिनिधी) : शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्यातर्फे “झेंडूचं फुल” हि अस्सल लेवा गणबोली भाषेतील, हसता हसता गंभीर भाष्य करणारी नाट्यकलाकृती सलग दोन दिवस छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह येथे दाखविण्यात आली. दोन्ही दिवस प्रचंड प्रतिसादासह जळगावकरांनी उपस्थिती दिली.

स्नेहयात्री प्रतिष्ठान निर्मित “झेंडूचं फुल” हे नाटक वीरेंद्र पाटील यांनी लेखन व दिग्दर्शन करून तयार केले आहे. त्याला राज्यशासनासह विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. यात ७ कलाकारांनी शेतकऱ्यांच्या जीवनाचे चित्रण दाखवून किती हाल अपेष्टा सहन करून तो स्वतःच्या परिवारासह समाज व देशासाठी योगदान देत असतो हे प्रभावीपणे सादर केले आहे. नाटकाच्या सुरुवातीला कलाकारांसह तंत्रज्ञांचा सन्मान खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे यांच्यासह माजी महापौर सीमा भोळे, माजी नगरसेविका रंजना वानखेडे, गायत्री राणे, राजू मराठे, विजय वानखेडे, दीप्ती चिरमाडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी खा. स्मिता वाघ यांनी मनोगतातून कलाकारांना शुभेच्छा देऊन प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासून शेतकऱ्याच्या कष्टाचे ऋण फेडले पाहिजे असे सांगितले. तर आ. भोळे म्हणाले, युवकांनी शेतीकडे वळले पाहिजे. शेती ओस पडते कि काय अशी स्थिती काही ठिकाणी दिसत आहे. आधुनिक शेती करून उत्पन्न घेता येते. शेतकरी राजा देशाचा पोशिंदा आहे. त्याला जगविणे हे समाज म्हणून आपले कर्तव्यच आहे, असेही आ. भोळे यांनी सांगितले. नाटक पाहण्यासाठी दोन्ही दिवस सभागृह हाऊसफुल्ल होता.


 

Next Post
एसटीच्या धडकेत रुग्णालय कर्मचारी ठार, दुचाकीचा चुराडा

एसटीच्या धडकेत रुग्णालय कर्मचारी ठार, दुचाकीचा चुराडा

ताज्या बातम्या

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे ‘चेस इन स्कूल’ उपक्रम सुरू; पुढील ५ वर्षांत ५ हजार शाळांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य!
क्रिडा

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे ‘चेस इन स्कूल’ उपक्रम सुरू; पुढील ५ वर्षांत ५ हजार शाळांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य!

October 31, 2026
गोदावरीत सरदार पटेल यांना अभिवादन; स्मृतींना दिला उजाळा
जळगाव जिल्हा

गोदावरीत सरदार पटेल यांना अभिवादन; स्मृतींना दिला उजाळा

October 31, 2026
प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन
जळगाव जिल्हा

प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन

October 31, 2026
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!
Uncategorized

अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!

October 30, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

नशिराबादजवळ डंपर व ट्रकची भीषण धडक; ट्रकचालकाचा मृत्यू, महामार्ग तीन तास ठप्प

October 30, 2026
कर वसुली करता, मग नागरिकांना सुविधा द्या!
खान्देश

कर वसुली करता, मग नागरिकांना सुविधा द्या!

October 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add