• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

सरपंचाने मागितली दहा हजार रुपयांची लाच ; दोघांवर गुन्हा दाखल

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथे एसीबीची कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 28, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
सरपंचाने मागितली दहा हजार रुपयांची लाच ; दोघांवर गुन्हा दाखल

जळगाव, (प्रतिनिधी) : घरकुलासाठी जागा नावावर करून देण्याकरिता सरपंचाने १० हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आलायं. दरम्यान लाच स्वीकारताना खाजगी इसमाला जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली आहे. यासंदर्भात पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी म्हणून खडकदेवळा येथील सरपंच अनिल विश्राम पाटील (वय ४६ वर्षे) व खाजगी इसम बलराम हेमराज भिल (वय ४६ वर्षे, दोन्ही रा.खडकदेवळा बु. ता. पाचोरा) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ४० वर्षीय तक्रारदार हे खडकदेवळा बुद्रुक गावातील रहिवासी आहेत. त्यांना प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर झाले असून तक्रारदार राहत असलेली जागा ही त्यांच्या नावावर नव्हती. त्यांच्या नावावर गाव नमुना आठ अ मध्ये नाव लावण्यासाठीचे काम ग्रामसेवक यांच्याकडून करून घेण्याच्या मोबदल्यात सरपंच अनिल पाटील यांनी शुक्रवार दि. २७ रोजी १० हजार रुपयांची लाचेची मागणी केल्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली व पडताळणी करण्यात आली.

शुक्रवारी दि. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी खाजगी इसमाकडे लाच देण्याचे सरपंचांनी सांगितल्यानंतर खाजगी इसम बलराम भिल याला लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. दोघांना अटक करण्यात आली व पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, राकेश दुसाने तसेच पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, हवालदार रवींद्र घुगे, सुनील वानखेडे, शैला धनगर, किशोर महाजन, बाळू मराठे, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Tags: CrimeJalgaon
Next Post
चिखलात फसल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा संशय

चिखलात फसल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचा संशय

ताज्या बातम्या

जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी
खान्देश

जळगावात २३ जानेवारीपासून ‘बहिणाबाई महोत्सवा’चा जागर; खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची मेजवानी

January 17, 2026
“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे
खान्देश

“जळगावकरांचा विश्वास सार्थ ठरणार, प्रभागाचा विकास हेच आमचे ध्येय” – विष्णू भंगाळे

January 17, 2026
आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय
जळगाव जिल्हा

आमदार भोळेंचा ऐतिहासिक करिष्मा; कर्जमुक्त महापालिका ते ‘क्लीन स्वीप’ विजय

January 17, 2026
भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता
जळगाव जिल्हा

भाजपने ओलांडला बहुमताचा आकडा; शिंदे गट-अजित पवार गटाच्या साथीनं जळगावात महायुतीची निर्विवाद सत्ता

January 16, 2026
जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली
जळगाव जिल्हा

जळगावकर मतदानाबाबत ‘थंडावले’; ५३.५९ टक्के मतदानामुळे राजकीय गणिते चक्रावली

January 15, 2026
जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू
खान्देश

जळगावच्या पिंप्राळ्यात गोळीबार; संशयित फरार, पोलिसांकडून शोध सुरू

January 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group