जळगाव (प्रतिनिधी) : येथील स्थानिक गुन्हे शाखा अर्थात एलसीबीच्या पथकाने तालुक्यातील कानळदा येथील एका इसमाला गावठी कट्टा व जिवंत काडतूस बाळगल्याच्या कारणावरून पारोळा तालुक्यातील देवगाव येथे अटक केली आहे.
सुहास भरत बाविस्कर (वय ३८) असे संशयित आरोपीचे नाव आहे. गोपनीय माहिती मिळाल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, अनिल जाधव, हवालदार दीपक माळी, रविंद्र पाटील, विलेश सोनवणे, हेमंत पाटील, प्रदिप चवरे यांचे पथक तयार करण्यात आले होते.(केसीएन) संशयित सुहास बावीस्कर (रा.कानळदा ता. जि.जळगाव) हा त्याचे कब्जात गावठी कट्टा घेवून दहशत माजविण्याचे उद्देशाने देवगाव ता.पारोळा येथे आला आहे.
त्यावरून देवगाव शिवारात जाऊन सुहास बावीस्कर यास एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात १५ हजार किमतीचे १ गावठी बनावटीचे पिस्टल तसेच ४ हजार किमतीचे २ जिवंत काडतुस मिळून आले.त्यास ताब्यात घेवून त्याचे विरुध्द पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याची वैद्यकिय तपासणी करून सदर गुन्ह्याचे पुढील तपासकामी पारोळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्ह्याची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली.