जळगाव (प्रतिनिधी) : घरात सर्व परिवार हजर असताना मात्र तरुणाने नैराश्याखाली येऊन वरच्या खोलीत जाऊन बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रुग्णालयात परिवाराने मन हेलावणारा आक्रोश केला.
गोपाळ छगन चौधरी (वय ४५, रा. पांजरपोळ टाकीजवळ, विठ्ठल पेठ, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते विठ्ठल पेठेत आई, वडील, पत्नी, ३ मुली यांच्यासह राहत होते. नेरी नाका चौकात गोपाळ यांचे वडील छगन चौधरी यांचे चहाविक्रीचे दुकान आहे.(केसीएन) तेथे गोपाळ हे वडिलांच्या व्यवसायाला हातभार लावित होते. दरम्यान, बुधवारी दि. ४ ऑगस्ट रोजी घरात गोपाळ यांचे आई, वडील, ३ मुली हे होते. तर दुपारी पत्नी सरिता या कामावरती गेलेल्या होत्या. त्यावेळी गोपाळ चौधरी यांनी वरच्या मजल्यावर जाऊन बाथरूममध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली.
गोपाळ हे खूप वेळ झाले वरच्या खोलीत गेले, आले नाही म्हणून काही वेळाने कुटुंबीय हे वरच्या मजल्यावर पाहण्यास गेले असता त्यांना गोपाळ हे गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आले. यावेळी कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला.(केसीएन) तत्काळ त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. माधुरी सोसे यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. यावेळी रुग्णालयात विठ्ठल पेठेतील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. चौधरी परिवाराला मानसिक धक्का बसला असून त्यांचा आक्रोश मन हेलावणारा होता. शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.