• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील तिघांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 27, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्ह्यातील तिघांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई

जळगाव, (प्रतिनिधी ) : आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता अबाधित राहावी या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंगळवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी काढले आहे. जळगाव एमआयडीसी, यावल आणि फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या तिन्ही गुन्हेगारांवर वेगवेगळ्या कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दुपारी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.

जळगाव शहरातील आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर वय-२४, रा. तुकाराम वाडी, जळगाव यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात वेगवेगळे स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल आहेत. यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश मधुकर बिऱ्हाडे वय-२२, रा. सिद्धार्थ नगर, यावल यांच्यावर १० वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल आहेत तर फैजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रवीण उर्फ डॉन गोपाळ तायडे वय-२८, रा. पाडळसा ता. यावल यांच्यावर तब्बल १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. या तिघांवर यापुर्वी पोलीसांकडून नोटीसा बजावण्यात आलेल्या होत्या. परंतू तिघांमध्ये कोणत्याची प्रकारची सुधारणा होत नव्हती. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी त्यांच्यावर अंकूश लावण्यासाठी एमपीडीए कायद्यांर्गत कारवाई करत स्थानबध्द करण्यात यावे असा प्रस्ताव तयार करून जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याकडे सादर केला.

त्यानुसार तिघांच्या प्रस्तावाचे अवलोकन करून मंजूरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानुसार रेकार्डवरील गुन्हेगार आकाश उर्फ खंड्या सुकलाल ठाकूर याला नागपूर कारागृहात तर आकाश बिऱ्हाडे आणि प्रवीण उर्फ डॉन तायडे या दोघांना मुंबई मध्यवर्ती कारागृहात स्थानबध्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.

Tags: CrimeJalgaonmpda
Next Post
बंद घर फोडून साडे तीन लाखांचा ऐवज लांबविला

बंद घर फोडून साडे तीन लाखांचा ऐवज लांबविला

ताज्या बातम्या

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 23, 2026
लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात
जळगाव जिल्हा

लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात

February 23, 2026
लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’
जळगाव जिल्हा

लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’

February 23, 2026
शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात
जळगाव जिल्हा

शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात

February 21, 2026
जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ
खान्देश

जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ

February 21, 2026
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group