• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावच्या रस्त्यांसाठी १०० कोटी देणार, नवीन एमआयडीसीची देखील घोषणा

आ. राजूमामा भोळे यांच्या मागणीला मुख्यमंत्री शिंदेंची मंजुरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 13, 2024
in जळगाव जिल्हा, महाराष्ट्र, राजकीय
0
जळगावच्या रस्त्यांसाठी १०० कोटी देणार, नवीन एमआयडीसीची देखील घोषणा

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील रस्ते नवीन बनविण्यासाठी आणखी १०० कोटी रुपये दिले जातील. यासाठी शहराचे आ. राजूमामा भोळे यांचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे. त्याला आता आम्ही मंजुरी देत आहे. तसेच, जळगावात नवीन एमआयडीसीची घोषणा करीत असून त्याद्वारे नवीन रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावात आल्यावर सांगितले.

जळगाव शहरात “माझी लाडकी बहीण” योजनेनिमित्त मेळावा सागर पार्कवर घेण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आ. राजूमामा उर्फ सुरेश भोळे यांनी शहराच्या रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांची मागणी केली होती. ज्या जिल्ह्याचे रस्ते चांगले त्यांची प्रगती वेगवान होते. त्यामुळे (अर्थमंत्री तथा उप मुख्यमंत्री अजितदादांकडे पाहून) आम्ही १०० कोटी रुपयाच्या प्रस्तावाला मंजुरी देत आहोत, असे ते म्हणाले.

तसेच, जळगावात नवीन एमआयडीसीची घोषणा करून उद्योगमंत्र्याना सांगून आम्ही भगिनींना रोजगार देण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत, असे शिंदे म्हणाले. पारोळा नगरपालिकेचा पाणीपुरवठा योजनांबाबत आ. चिमणराव पाटील यांच्या प्रस्तावासाठी आम्ही जीआर काढलेला आहे अशीही माहिती त्यांनी दिली.

Tags: #ekanathshinde #jalgaon #maharashtra
Next Post
जळगाव जिल्ह्यात २६३ महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जळगाव जिल्ह्यात २६३ महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या

ताज्या बातम्या

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add