• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत तरुणीने केली आत्महत्या !

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 7, 2024
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत तरुणीने केली आत्महत्या !

म्हसावद जळगाव रेल्वे स्टेशनदरम्यानची घटना

जळगाव | दि. ०७ ऑगस्ट २०२४ | काशी एक्सप्रेस या धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना म्हसावद रेल्वे स्थानकाजवळ डाऊन रेल्वे लाईनवर आज दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूच्या नोंदीचे काम सुरु होते.

प्रियंका अरुण गोसावी (वय २४, रा. एकनाथ नगर, मेहरूण परिसर, जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती मेहरूणमध्ये एकनाथ नगरात परिवारासह राहत होती. तिचे जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या महाविद्यालयात एमसीएचे शिक्षण सुरू होते.दरम्यान बुधवारी दि. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ती महाविद्यालयात गेली असल्याची माहिती मिळाली. तर आज दुपारी जळगाव तालुक्यातील म्हसावद ते डोमगाव रत्यालगत तिने तिची दुचाकी क्रमांक (एमएच १९ बीआर ६८८९) लावल्यानंतर म्हसावद गावालगत असलेल्या रेल्वे गेट जवळ रुळावर स्वतःला झोकून देत आत्महत्या केली.

कागदपत्रावरून पटली ओळख

दरम्यान रुळावरील गॅंगमनला घटना समजताच त्यांनी स्टेशन मास्तरला कळविले . त्यावरून रेल्वे दूरक्षेत्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी तरुणीची बॅग, मोबाईल आढळले.त्यात महाविद्यालयाचे ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड अशी कागदपत्रे आढळून आली. त्यावरून तिची ओळख पटली. त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनला देखील माहिती मिळताच पोहेकॉ प्रदीप पाटील, पोकॉ मनोज पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी तरुणीच्या नातेवाईकांना माहिती दिली असून दरम्यान मृतदेहाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू होते. तरुणीने आत्महत्या का केली याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट नाही.या घटनेची नोंद जीआरपी पोलिसांकडे करण्यात येत असून पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहे.


 

Tags: CrimeJalgaonsuicide
Next Post
दागिने खरेदीला संधी : सोन्या चांदीची उतरली झळाळी !

दागिने खरेदीला संधी : सोन्या चांदीची उतरली झळाळी !

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add