• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 31, 2024
in जळगाव जिल्हा
0
जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी

मुंबई – जळगाव | दि. ३१ जुलै २०२४ | देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे कन्सोलिडेटेड आणि स्टँडअलोन आर्थिक निकाल जाहीर केले. ३१ जुलै रोजी मुंबई येथे संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत कंपनीचे कन्सॉलिडेटेड (एकत्रित) उत्पन्न जवळजवळ १४७८ कोटी रुपये झाले. कर, व्याज व घसारापूर्व नफा (EBITDA-इबीडा) १८०.८ कोटी रुपयांवर पोहोचला.

“यापूर्वी सांगितल्याप्रमाणे Q1FY25 चा महसूल कमी अपेक्षीत होता आणि त्यामुळे नकारात्मक परिणाम दिसला. मुख्यतः जल जीवन मिशनच्या संस्थात्मक व्यवसायामुळे देशांतर्गत विक्री कमी झाल्यामुळे एकत्रित महसूल (उत्पन्न) सुमारे १३ टक्क्यांनी घटला. धोरणात्मक निर्णयाने ठरल्याप्रमाणे आम्ही प्रकल्प व्यवसाय कमी करत आहोत.

ऐतिहासिकदृष्ट्या, पावसाच्या काळात सूक्ष्म सिंचनासाठी व्यवसाय मंदावलेला असतो. तथापि, चांगला मान्सून आणि अलीकडील अर्थसंकल्पात कृषी, सिंचन क्षेत्र, मायक्रो, स्मॉल व मीडियम एन्टरप्रायजेस आणि कृषी-संबंधित व्यवसायांना मदत/अर्थसहाय्य सरकारने केलेल्या घोषणेमुळे या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत मागणीचे पुनरुज्जीवन होऊन मंदावलेली मागणी वाढण्याची अपेक्षा आहे. आम्हाला आमच्या सर्व कार्यक्षेत्रांतील व्यवसायामध्ये चांगल्या व्यवसाय संधींची आशा आहे. या पार्श्वभूमिवर कंपनी शाश्वत वाढ करण्यावर आपले लक्ष केंद्रित करत आहे,” असे जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले.

Next Post
वंजारी युवा संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

वंजारी युवा संघटनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

खून प्रकरणातील ‘मोस्ट वाँटेड’ आरोपीला जळगावातून बेड्या; गावठी कट्टा व तलवारीसह दोघे अटकेत
गुन्हे

खून प्रकरणातील ‘मोस्ट वाँटेड’ आरोपीला जळगावातून बेड्या; गावठी कट्टा व तलवारीसह दोघे अटकेत

March 25, 2026
बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन
खान्देश

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद
गुन्हे

नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
चोपड्याच्या ओम पाटीलच्या धाडसाचे मोठे फळ; जैन इरिगेशनने घेतली संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी
जळगाव जिल्हा

चोपड्याच्या ओम पाटीलच्या धाडसाचे मोठे फळ; जैन इरिगेशनने घेतली संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी

March 24, 2026
इतिहास घडविण्याची संधी: जळगावच्या ॲड. रेखा घनश्याम कोचुरे आणि ॲड. गुलाबसिंग पाटील बार कौन्सिलच्या रिंगणात!
जळगाव जिल्हा

इतिहास घडविण्याची संधी: जळगावच्या ॲड. रेखा घनश्याम कोचुरे आणि ॲड. गुलाबसिंग पाटील बार कौन्सिलच्या रिंगणात!

March 23, 2026
महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी ‘अग्निशिखा’ ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव
जळगाव जिल्हा

महिलाशक्तीचा जागर | २२ मार्च रोजी ‘अग्निशिखा’ ग्रुपतर्फे भव्य मेळावा ; कर्तृत्ववान महिलांचा होणार गौरव

March 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group