• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोदी सरकारने सत्तेचा गैरवापर करीत शेतकऱ्यांना उध्वस्त केले.. – शरद पवार

चोपडा येथे श्रीराम पाटील यांची प्रचार सभा संपन्न

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 3, 2024
in राजकीय
0
मोदी सरकारने सत्तेचा गैरवापर करीत शेतकऱ्यांना उध्वस्त केले.. – शरद पवार

चोपडा, दि.०३ – केंद्रातील सरकारने कायमच शेतकऱ्यांच्या विरोधात काम केले असून या सरकारने सत्तेचा गैरवापर केला आहे, अशी टीका केंद्रीय माजी कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. श्री पवार पुढे म्हणाले की, २०१४ मध्ये नरेंद्र मोदींनी युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, महिलांच्या सुरक्षिततेची हमी दिली होती, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मोदींनी यापैकी कोणत्याच आश्वासनांची पूर्तता केली नाही. मात्र या काळात सत्तेचा दुरुपयोग करीत सत्ता जनतेच्या भल्यासाठी न वापरता ती स्वार्थासाठी वापरली असा घणाघात शरद पवार यांनी केला.

महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा येथील आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उमेदवार श्रीराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड रवींद्र पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत, आमदार शिरीष चौधरी, माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा निरीक्षक प्रसेंजित पाटील

माजी आमदार कैलास पाटील, माजी आ. अरुण पाटील, माजी आ. रमेश चौधरी, माजी आ. डॉ बी एस पाटील, विष्णू भंगाळे, माजी आ. दिलीप सोनवणे, विनायक पाटील, इंदिराताई पाटील, गोरख पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, घनश्याम पाटील, विजया पाटील, नीलम पाटील, प्रतिभा शिंदे, भारती बोरसे, जगन पाटील, सुरेश पाटील, जगन सोनवणे, चोपडा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय सोनवणे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, श्री सांगोरे, डी पी साळुंखे, चंद्रहास गुजराती उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अरुणभाई गुजराथी यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार.. – श्रीराम पाटील
महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी आपण मेगा रिचार्जसह पाडळसरे प्रकल्पाला निधी आणून तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू असे अभिवचन दिले. संपूर्ण मतदारसंघात अधिकाधिक रोजगार निर्मिती प्रकल्प उभारून यावलच्या व्यास मंदिरासाठी पाल आणि परिसरातील पर्यटन स्थळांसाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. केळी पीक विम्याचे अजूनही हजारो शेतकऱ्यांची भरपाई प्रलंबित असून मतदारसंघात केळीवर प्रक्रिया करणारा एकही उद्योग नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आपल्याला संधी देण्याचे आवाहन श्रीराम पाटील यांनी केले.

 


 

Next Post
महायुतीच्या उमेदवार खा. रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मलकापूर येथे विजय संकल्प मेळावा संपन्न

महायुतीच्या उमेदवार खा. रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ मलकापूर येथे विजय संकल्प मेळावा संपन्न

ताज्या बातम्या

‘धूम स्टाईल’ चोरीचा फियास्को! गळ्यातून ओढली, पण पोत निघाली बेन्टेक्सची
खान्देश

‘धूम स्टाईल’ चोरीचा फियास्को! गळ्यातून ओढली, पण पोत निघाली बेन्टेक्सची

November 26, 2025
आयकर भरण्याविषयी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांमध्ये जागरूकता
खान्देश

आयकर भरण्याविषयी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांमध्ये जागरूकता

November 26, 2025
‘गंधार’तर्फे स्व. राजाराम देशमुख करंडक मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा
खान्देश

‘गंधार’तर्फे स्व. राजाराम देशमुख करंडक मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा

November 26, 2025
मतदार याद्या अद्ययावत केल्याशिवाय निवडणूक न घेण्याची ‘राष्ट्रवादी शरद पवार’ पक्षाची मागणी
खान्देश

मतदार याद्या अद्ययावत केल्याशिवाय निवडणूक न घेण्याची ‘राष्ट्रवादी शरद पवार’ पक्षाची मागणी

November 26, 2025
अमळनेरात शिवसेनेचा आज ‘पॉवर शो’! खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांची पहिली जाहीर सभा
खान्देश

अमळनेरात शिवसेनेचा आज ‘पॉवर शो’! खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांची पहिली जाहीर सभा

November 26, 2025
१५ हजारांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘आरेखक’ एसीबीच्या जाळ्यात!
खान्देश

१५ हजारांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘आरेखक’ एसीबीच्या जाळ्यात!

November 25, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group