जळगाव, दि.०५ – सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उपक्रमशील शिक्षक, चित्रकार सुनिल न्हानू दाभाडे यांना शांती फाऊंडेशन अशोकपूर टिकिया वजीरगंज, गोंडा, उत्तर प्रदेश तर्फे सावित्रीबाई फुले सन्मान २०२४ ने सन्मानित करण्यात आले. शांती फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती पिंकी देवी, सचिव गया प्रसाद आनंद, खजिनदार रमेश आनंद, संस्थापक शिव प्रसाद, मीडिया प्रभारी संजय कुमार आणि कार्यक्रम समन्वयक सुनील कुमार आनंद यांनी चित्रकार सुनिल दाभाडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.
बालिका शिक्षण, बेटी बचाओ, बेटी पढाओ, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दाभाडे यांना हा पुरस्कार मिळाला. दरम्यान मानव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. आर.एस.डाकलिया, मानद सचिव विश्वनाथ जोशी, शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर विजय लुल्हे, पंकज नाले, प्रेमकुमार सपकाळे, सचिन मुसळे, शाम कुमावत, निरंजन शेलार, मनोज जंजाळकर,अविनाश मोघे, योगेश सुतार यांनी अभिनंदन केले.