जळगाव, दि. ०१ – आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत आमदार सुरेश भोळे (राजुमामा) यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक ८ मध्ये पिंप्राळा शिवार येथील प्रेम नगर परिसरात ओपन स्पेस मध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार सुरेश भोळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
या प्रसंगी माजी नगरसेवक डॉ. चंद्रशेखर पाटील, मनोज चौधरी, माजी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, मंडळ अध्यक्ष शक्ती महाजन, मनीलाल चौधरी आदी मान्यवरांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.