• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर

डॉ. गणेश देवी, जिग्नेश मेवाणी आणि चित्रकार राजू बाविस्कर मानकरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 17, 2023
in जळगाव जिल्हा
0
पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर

मुंबई, दि.१७ – साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृति पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी ज्येष्ठ साहित्यिक आणि भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि गुजरातचे प्रभावी नेते,मानवी हक्क कार्यकर्ता आणि आमदार जिग्नेश मेवाणी यांची निवड झाली आहे. सोबतच ‘काळ्या निळ्या रेषा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी चित्रकार राजू बाविस्कर यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार जाहीर झाला आहे. दया पवार स्मृति पुरस्काराचे यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या सहकार्याने शुक्रवार, २७ ऑक्टोबर २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट, मुंबईच्या ‘रंगस्वर’ सभागृहात ज्येष्ठ संपादक आणि खासदार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली दया पवार स्मृती पुरस्कार २०२३ वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यादरम्यान कवी- अभिनेता अक्षय शिंपी यांचे कथाकथन आणि ‘झुंड’फेम विपीन तातड आणि माही जी. या रॅप क्षेत्रात सध्या धुमाकूळ घालणाऱ्या कलाकारांचा रॅप सादर होणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार अलका धुपकर करणार आहेत.

यंदाचा हा पंचविसावा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी दहा हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यासंबंधी अधिक माहिती देताना दया पवार प्रतिष्ठानचे सचिव प्रशांत पवार यांनी सांगितले की, दया पवार स्मृति पुरस्काराचे यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. सलग २५ वर्षे एखादी कृती सुरू ठेवणे हे आजच्या काळात सोपे नाही, मात्र प्रत्येक कार्यक्रमाला वाढत जाणारे जुन्या पिढीतले आणि नव्याने जोडले जाणारे दया पवारांचे तरुण चाहते या एकमेव गोष्टीमुळे दया पवार प्रतिष्ठानला हा कार्यक्रम करण्यासाठी नवीन उर्जा मिळत असते.

सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून दया पवारांच्या चाहत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा दया पवार यांनी केले आहे.


 

Next Post
गोंडगाव पीडितेच्या कुटुंबास पाच लाखांचा निधी मंजूर

गोंडगाव पीडितेच्या कुटुंबास पाच लाखांचा निधी मंजूर

ताज्या बातम्या

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत

September 27, 2026
एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी
गुन्हे

एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी

September 24, 2026
घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने
गुन्हे

घरमालक बाहेर जाताच मोलकरणीने लांबविले ५५ हजारांचे दागिने

September 24, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

September 24, 2026
दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
जळगाव जिल्हा

दुष्काळसदृश्य परिस्थितीत पिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

September 24, 2026
काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’
खान्देश

काव्यरत्नावली चौकात उलगडले ‘छत्रपतींचे प्रशासन’

September 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add