• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जैन हिल्सवर प्रातिनिधीक पोळा साजरा VIDEO

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
September 6, 2021
in सामाजिक
0
जैन हिल्सवर प्रातिनिधीक पोळा साजरा VIDEO

जळगाव, दि. 6 – ‘‘शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हाच माझा सर्वोच्च पुरस्कार!’’ मानणाऱ्या श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी जैन हिल्सवर भूमिपुत्र आणि सहकाऱ्यांसह पोळा साजरा करण्याची प्रथा सुरू केली. कोरोना पार्श्वभूमीवर जैन हिल्स येथे शासकीय नियम पाळून प्रातिनिधीक स्वरूपाचा छोटेखानी पोळा साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भूमिपुत्रांशी बांधिलकी असणाऱ्या जैन इरिगेशनतर्फे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सौ. ज्योती जैन तसेच कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन व सौ. शोभना जैन यांनी पोळ्याच्या सोहळ्यावेळी तेथेच मांडलेल्या सप्तधान्यासह बैल जोड्यांचे विधीवत पूजन करुन बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य भरविला. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात सौ. ज्योती जैन व सौ. शोभना जैन यांच्या हस्ते पाच सालदार गडींना सपत्नीक भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. जैन इरिगेशनच्या कृषी विभागात पन्नास सालदार गडी कार्यरत आहेत.

प्रस्तुत प्रातिनिधीक पूजनानंतर जैन हिल्स टॉप, भाऊंची सृष्टी, जैन डिव्हाईन पार्क, जैन व्हॅली व्यूव्ह, जैन लेक व्यूव्ह, टिश्यूकल्चर पार्क, टाकरखेडा अशा विविध स्थळी शेतीनिहाय विभागात स्वतंत्रपणे पोळा साजरा करण्यात आला. त्या-त्या विभागाच्या प्रमुखांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.

सुमारे २५ बैल जोड्यांना सजवून त्यांची भाऊंच्या समाधी स्थळापर्यंत (श्रद्धाज्योत) साध्या पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. श्रद्धेय मोठ्याभाऊंना नमन करणारा वृषभराज नम्रतेचं आणि कृतज्ञतेचं प्रतीक आहे. पोळ्याचे तोरणही लावण्यात आले. यावेळी जैन रेसिडेन्सी पार्क विभागाचे सालदार गडी भगवान साबळे यांच्या बैलाने पोळा फोडला. आरोही जैन, अन्मय जैन, डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव, संजय सोनजे, अजय काळे, पी. ए. पाटील, रवी कमोद, प्रसाद साखरे व सहकारी तसेच शेती विभागातील जैन हिल्स येथे रहिवास असलेल्या सालदार सहकाऱ्यांच्या परिवारातील सदस्यही आरोग्याच्या दृष्टीने पूर्ण सुरक्षितता बाळगून उपस्थित होते.

 


 

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatखान्देश प्रभातजळगाव
Next Post
सर्जाराजाचा पोळा सण डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात साजरा

सर्जाराजाचा पोळा सण डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात साजरा

ताज्या बातम्या

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे ‘चेस इन स्कूल’ उपक्रम सुरू; पुढील ५ वर्षांत ५ हजार शाळांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य!
क्रिडा

महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेतर्फे ‘चेस इन स्कूल’ उपक्रम सुरू; पुढील ५ वर्षांत ५ हजार शाळांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य!

October 31, 2026
गोदावरीत सरदार पटेल यांना अभिवादन; स्मृतींना दिला उजाळा
जळगाव जिल्हा

गोदावरीत सरदार पटेल यांना अभिवादन; स्मृतींना दिला उजाळा

October 31, 2026
प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन
जळगाव जिल्हा

प्लास्टिव्हिजन इंडिया २०२७ ठरणार जगातील दुसरे सर्वात मोठे प्लास्टिक प्रदर्शन

October 31, 2026
अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!
Uncategorized

अवघ्या चार महिन्यांच्या बाळाला मिळाले नवजीवन!

October 30, 2026
ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर
गुन्हे

नशिराबादजवळ डंपर व ट्रकची भीषण धडक; ट्रकचालकाचा मृत्यू, महामार्ग तीन तास ठप्प

October 30, 2026
कर वसुली करता, मग नागरिकांना सुविधा द्या!
खान्देश

कर वसुली करता, मग नागरिकांना सुविधा द्या!

October 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add