• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

युवारंग- २०२३ चे यंदा मुळजी जेठा महाविद्यालयात आयोजन

युवारंगच्या 'कान्ह कलानगरी' लोगोचे विमोचन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 6, 2023
in मनोरंजन, शैक्षणिक
0
युवारंग- २०२३ चे यंदा मुळजी जेठा महाविद्यालयात आयोजन

जळगाव, दि.०६ – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आयोजित युवा रंग २०२३ खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाचे प्रा. जयेंद्र लेकुरवाले, प्राचार्य संजय भारंबे (मूळजी जेठा महाविद्यालय), राजेंद्र नन्नवरे (राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य), अँड. प्रवीणचंद्र जंगले, शशिकांत वडोदकर (सांस्कृतिक समन्वयक) युवारंग समन्वयक डॉ. जुगलकिशोर दुबे, सहसमन्वयक डॉ. मनोज महाजन यांच्या हस्ते पत्रकार परिषदेत युवारंगच्या ‘कान्ह कलानगरी’ लोगोचे विमोचन यावेळी करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आयोजित युवा रंग २०२३ खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या मूळजी जेठा (स्वायत्त) महाविद्यालय कान्ह कला नगरीत दि. ७ ते ११ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.

यात जळगाव धुळे व नंदुरबार या तिघं जिल्ह्यामधून सुमारे १५९५ विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होणार असून पहिल्या दिवशी दि.७ रोजी सांस्कृतिक पथसंचलन दुपारी चार वाजता मूळजी जेठा महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरू होईल. यामध्ये विद्याथ्यांचे सांस्कृतिक पथसंचलन असेल ज्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, शिवराज्याभिषेक सोहळा अशा विविध विषयांना विद्यार्थी पेहराव करून या पथसंचलनात सहभागी होणार आहेत तर उद्घाटन सोहळा दुसऱ्या दिवशी दि.८ रोजी सकाळी दहा वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय माहेश्वरी, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आयोजन समितीचे अध्यक्ष तथा केसीई संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, कार्याध्यक्ष राजेंद्र ननवरे आदी मान्यवरांनी उपस्थिती राहतील. या पाच दिवस चालणान्या युवा रंग युवक महोत्सवात मूळजी जेठा महाविद्यालयाच्या प्रांगणात पाच रंगमंच तयार करण्यात आले आहेत.

या युवारंग युवक महोत्सवात संगीत- भारतीय शास्त्रीय गायन, भारतीय शास्त्रीय वाद्य, संगीत -नाट्यसंगीत, भारतीय सुगम संगीत, भारतीय समूह गाण, भारतीय लोकसंगीत वाद्य- पाश्चिमात्य गायन, पाश्चिमात्य वाद्य, संगीत पाश्चिमात्य समूह गान, नृत्य- भारतीय शास्त्रीय नृत्य, भारतीय लोक समूह नृत्य, वाङ्मयीन कला प्रकारात वकृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा रंगमंच या कला प्रकारात नक्कल, मुकाभिनय, प्रहसन आणि ललित कला प्रकारात स्थळचित्र, चिकटकला, पोस्टर मेकिंग, माती कला, व्यंगचित्र, रांगोळी, स्थळ छायाचित्र, इन्स्टॉलेशन, मेहंदी या विषयांवर विद्यार्थी सादरीकरण करणार आहेत. याकरिता परीक्षक बाह्य विद्यापीठाच्या कक्षेतील आहेत. यासह विद्यार्थ्यांची निवासी राहण्याची व्यवस्था स्वामी विवेकानंद भवन येथे ६०० विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ७०० यांची निवासी व्यवस्था मुलींच्या वसतिगृहात केली आहे.

कार्यक्रमाचा समारोप आणि बक्षीस वितरण दि. ११ रोजी होणार असून या करिता कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एस.टी. इंगळे (प्र कुलगुरू, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ), सुप्रसिद्ध सिने कलाकार सुरभी हांडे, आ. शिरीष चौधरी, आ. सुरेश भोळे, डॉ. विनोद पाटील, एड. प्रवीणचंद्र जंगले, ज्ञानदेव पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र ननवरे, भालचंद्र पाटील उपस्थित राहणार आहेत. पत्रकार परिषदेला विद्यार्थी विकास विभागाचे प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, प्राचार्य संजय भारंबे उपस्थित राहतील.


 

Next Post
दहाड स्मृती क्रिकेट स्पर्धेला सुरुवात, पहिल्या दिवशी स्वराज रेडियन्स, गोल्डन इलेव्हन संघ विजेते

दहाड स्मृती क्रिकेट स्पर्धेला सुरुवात, पहिल्या दिवशी स्वराज रेडियन्स, गोल्डन इलेव्हन संघ विजेते

ताज्या बातम्या

प्रा. वसंत हंकारे यांचे १३ ऑक्टोबरला जामनेरात व्याख्यान; साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानचा पुढाकार
जळगाव जिल्हा

प्रा. वसंत हंकारे यांचे १३ ऑक्टोबरला जामनेरात व्याख्यान; साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानचा पुढाकार

October 5, 2026
जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप
जळगाव जिल्हा

जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप

October 5, 2026
५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी
Uncategorized

५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी

October 5, 2026
एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड
गुन्हे

एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड

October 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
खान्देश

रेल्वे स्थानकावर प्रकृती खालावली अन् बांगलादेशी महिलेचे बिंग फुटले

October 5, 2026
आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
खान्देश

आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

October 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add