जळगाव, दि. १६ – शहरात थिएटर आम्रपाली या संस्थेची नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून वर्षभरात सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याचे नियोजन करण्यात आले. नूतन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी अॕड. संजय मनोहर राणे यांची तर सचिवपदी सुनील वसंत महाजन यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी सुबोध जयंत सराफ, खजिनदारपदी नितीन अनंत अट्रावलकर यांची निवड झाली आहे. तर डॉ. जयंत जहागीरदार, विवेक जोशी, दत्तात्रय अपस्तंभ, पुरुषोत्तम जोशी, नितीन देशमुख, शमा सराफ, दिपाली पाटील यांची सदस्यपदी निवड झाली आहे. बैठकीमध्ये राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा घेणे, तसेच नवीन कलावंत निर्मितीसाठी नाट्य प्रशिक्षण शिबिर घेण्यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्याबाबत ठरवण्यात आले आहे.