• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

ना.धों. महानोरांच्या आठवणींना दिला उजाळा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
August 16, 2023
in जळगाव जिल्हा
0
माजी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी घेतली ना. धों. महानोर कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

जळगाव दि.१६ – माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी ना.धों. महानोर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट आज पळसखेड येथील आनंदयात्री या निवासस्थानी घेतली. यावेळी त्यांच्या सोबत माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, जैन इरिगेशन सि.लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, रंगनाथ काळे, माजी आमदार किशोर पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डाॕ. सुधीर भोंगळे, विजय बोराडे, ॲड. रविंद्र पाटील, संजय गरुड, डि. के. पाटील, जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

ना. धों. महानोर यांचे चिरंजीव डाॕ. बाळासाहेब महानोर, गोपाळ महानोर, भाऊ पुंडलिक महानोर, मुली मिरा, सरला, रत्ना व नातु शशीकांत व नातवंड यांच्याशी पारिवारिक संवाद साधला. आनंदयात्री या निवासस्थानी जवळपास अर्धा तास कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली.

पळसखेडचे भुमिपुत्र कविवर्य ना. धों. महानोर व वाकोदचे उद्योजक भवरलालभाऊ जैन हे दोघंही माझे सहृदयी मित्र. दोघांनी शेत, शेती, माती आणि पाणी यासाठी आयुष्यभर व्रतस्थपणे कार्य केले. दोघं आता नाहीत मात्र त्यांचे कार्य हे शाश्वत आहे. कविवर्य ना. धों. महानोरांविषयी बोलताना साहित्य, शेती आणि फळबागांच्या धोरणांवर शरद पवार यांनी मैत्रीपूर्ण आठवणी सांगितल्या. निसर्ग जवळून बघितला तेच त्यांच्या साहित्यात उतरले. त्यामुळेच शेतीविषयी वस्तुनिष्ठ धोरणांवर ते विधान परिषदेत भाष्य करत, अशी आठवण त्यांनी सांगितली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांना साहित्याच्या माध्यमातून व राजकीय माध्यमातून त्यांनी वाचा फोडल्याचे शरद पवार म्हणाले. १९८० साली जळगाव पासून जी शेतकरी दिंडी काढण्यात आली. त्याच्या आयोजनामध्ये कवी ना. धो. महानोर यांचा पुढाकार होता. जळगाव ते नागपूर अशा निघालेल्या या दिंडीमध्ये मा. यशवंतराव चव्हाण साहेब, प्रा. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख व मी स्वतः तसेच प्रल्हादभाऊ पाटील व अनेक मान्यवर नेते सहभागी झाले होते.

महाराष्ट्रात पाणलोट क्षेत्र विकासाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जावा असा आग्रह कवि ना. धों. महानोर यांनी धरून विधानपरिषदेत पाणी अडवा पाणी जिरवा, जलसंधारण, मृदसंधारण आणि बंधा-यांची साखळी उभी करण्याचा आग्रह धरला. त्यांनी स्वतः पळसखेडे आणि वाकोदच्या परिसरात बंधा-याची साखळी उभी करून दाखवली. रोजगार हमी योजनेशी निगडित शंभर टक्के शासकीय अनुदानावरती जी फळबाग योजना १९९०-९१ मध्ये महाराष्ट्रात राबविण्यास प्रारंभ केला. या योजनेची मांडणी करण्यात हि कवि ना. धों. महानोरांचा पुढाकार होता. शेती, पाणी, फळबागा व वनीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय होते. त्याचा फायदा संपूर्ण राज्याला कसा होईल, हे त्यांनी आवर्जून बघितले असेही शरद पवार म्हणाले.


 

Next Post
थिएटर आम्रपाली संस्थेच्या अध्यक्षपदी अॕड. संजय राणे तर सचिवपदी सुनील महाजन यांची निवड

थिएटर आम्रपाली संस्थेच्या अध्यक्षपदी अॕड. संजय राणे तर सचिवपदी सुनील महाजन यांची निवड

ताज्या बातम्या

अमळनेर शहरासाठी ‘स्वच्छ’ नेतृत्वाची गरज: माजी आ. शिरीष चौधरी यांचे मत
खान्देश

अमळनेर शहरासाठी ‘स्वच्छ’ नेतृत्वाची गरज: माजी आ. शिरीष चौधरी यांचे मत

November 23, 2025
स्टार्टअप उद्योजकांना मिळाले ४० कोटींचे अर्थसहाय्य; लीड बँकेचा उपक्रम
खान्देश

स्टार्टअप उद्योजकांना मिळाले ४० कोटींचे अर्थसहाय्य; लीड बँकेचा उपक्रम

November 23, 2025
भव्य रॅलीने एरंडोलमध्ये ‘युती’चा झंझावात!
खान्देश

भव्य रॅलीने एरंडोलमध्ये ‘युती’चा झंझावात!

November 23, 2025
शेतीचे अवशेष ‘कचरा’ नव्हे, ‘उत्पन्न’! जैन इरिगेशन उभारणार देशातील सर्वात मोठा बायोचार प्रकल्प
कृषी

शेतीचे अवशेष ‘कचरा’ नव्हे, ‘उत्पन्न’! जैन इरिगेशन उभारणार देशातील सर्वात मोठा बायोचार प्रकल्प

November 22, 2025
डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या प्रचारफेरीला एरंडोलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खान्देश

डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या प्रचारफेरीला एरंडोलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

November 22, 2025
एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई! ६१ गॅस सिलेंडर चोरीचे प्रकरण उघड
खान्देश

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई! ६१ गॅस सिलेंडर चोरीचे प्रकरण उघड

November 21, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group