• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ संपन्न

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 14, 2023
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ संपन्न

जळगाव, दि.१४ – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन व जैन स्पोर्ट्स ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड जळगाव प्रायोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड स्पर्धा २०२३ यशस्वीरित्या पार पडल्या. या स्पर्धा दिनांक ०९ जुन ते ११ जुन २०२३ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या.

या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १९० खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जैन स्पोर्टस अकॅडमी चा राष्ट्रीय खेळाडू शुभम पाटील व जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सदस्य शेखर जाखेटे तसेच जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे क्रीडा समन्वयक रवींद्र धर्माधिकारी व मुख्य पंच चेतना शाह, डॉ. अमित राजपूत उपस्थित होते.

याप्रसंगी पुणे येथे नुकत्याच झालेल्या सिनियर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये जैन स्पोर्ट्स अकॅडमी चा खेळाडू शुभम पाटील याने उत्कृष्ट कामगिरी करून यशस्वी सहभाग नोंदविला, तसेच साऊथ कोरिया येथे होत असलेल्या वर्ल्ड मास्टर्स चॅम्पियनशिप मध्ये श्रीमती वृषाली पाटील यांची निवड झाल्याबद्दल बॅडमिंटन साहित्य देऊन या दोघांचा संघटनेच्या वतीने सचिव विनीत जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे व विजेता खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे यांनी केले व पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Next Post
राज्यस्तरीय फिन्सस्विमिंग स्पर्धेत पोलीस जलतरण तलावाचे वर्चस्व

राज्यस्तरीय फिन्सस्विमिंग स्पर्धेत पोलीस जलतरण तलावाचे वर्चस्व

ताज्या बातम्या

प्रा. वसंत हंकारे यांचे १३ ऑक्टोबरला जामनेरात व्याख्यान; साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानचा पुढाकार
जळगाव जिल्हा

प्रा. वसंत हंकारे यांचे १३ ऑक्टोबरला जामनेरात व्याख्यान; साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानचा पुढाकार

October 5, 2026
जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप
जळगाव जिल्हा

जिवंतपणी ज्येष्ठांची सेवा हेच महापुण्य; मातोश्री यमुनाई वृद्धाश्रमात साहित्याचे मोफत वाटप

October 5, 2026
५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी
Uncategorized

५८व्यांदा रक्तदान करून पै. शिवाजी पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी

October 5, 2026
एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड
गुन्हे

एमडी ड्रग्जचा ‘किंगपीन’ अज्जू मालेगाव पोलिसांच्या रडारवर ; अजय गारुंगेला पुरवठा केल्याचे चौकशीत उघड

October 5, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
खान्देश

रेल्वे स्थानकावर प्रकृती खालावली अन् बांगलादेशी महिलेचे बिंग फुटले

October 5, 2026
आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू
खान्देश

आजोबांच्या वर्षश्राद्धासाठी बहिणीला घेण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

October 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add