• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘महाराष्ट्र बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ पुरस्काराने अशोक जैन यांचा सन्मान

ग्रॅड मास्टर अभिजीत कुंटे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन उत्साहात साजरा

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 7, 2023
in क्रिडा, जळगाव जिल्हा
0
‘महाराष्ट्र बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ पुरस्काराने अशोक जैन यांचा सन्मान

जळगाव, दि.७ – महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीतर्फे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना शुक्रवारी २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते. याप्रसंगी घेण्यात आलेल्या एकत्रितरित्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावची साक्षी शुक्ला हिने ग्रॅड मास्टर अभिजीत कुंटे यांच्यासोबत बरोबरी साधली. जैन हिल्स च्या सुधिर बोस सभागृहात झालेल्या सोहळ्याप्रसंगी ध्यानचंद पुरस्कारार्थी व भारतीय बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक ग्रॅंड मास्टर अभिजीत कुंटे, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीचे मकरंद वेलणकर, संजय आढाव, राघव पठाडे, सुधीर भालेराव उपस्थित होते.

खेळ आणि खेळाडू मोठे झाले पाहिजे या एकाच ध्येयामुळे अशोक जैन यांनी काम केले आणि करित आहे. त्यासाठी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता ते सतत कार्य करीत आहे. आमच्यासारख्या खेळाडूंच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहत आहेत. आज महाराष्ट्रात ११ पुरूष व ५ महिला ग्रॅंड मास्टर असून अनेक आंतरराष्ट्रीय पंच झाले आहेत. त्याचे श्रेय हे अशोक जैन यांनी केलेल्या पायाभूत कार्यात आहे असेही अभिजीत कुंटे म्हणाले.

पुरस्काराला उत्तर देताना अशोक जैन यांनी लहानपणाच्या बुद्धिबळातील आठवणींना उजाळा दिला. अभिजीत कुंटे ह्यांनी आपण बुद्धिबळामध्ये कार्य करावे असे सुचविले आणि त्यातूनच पुन्हा बुद्धिबळाकडे वळलो. महाराष्ट्रात चेसिंग स्कूल, चेस लिग सुरू करावे. जेणे करून या स्पर्धात्मक उपक्रमातून चांगल्या गुणवत्तेचे खेळाडू पुढे येतील. सर्वांनी मिळून खेळ वाढविला पाहिजे. आतापर्यंत महाराष्ट्रातील खेळाडूंनी सह्याद्री काबीज केला आहे. आता आपण हिमालयाच्या पायथ्याशी आहोत. तोही सर करावा. अशी ही अपेक्षा बुद्धिबळ प्रेरणा दिनानिमित्त आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान ग्रॅंड मास्टर अभिजीत कुंटे यांनी निलेप पाटील, सानिया रफिक तडवी, तसीन रफिक तडवी, जयेश सपकाळे, दुर्वेश कोळी, साक्षी शुक्ला, आम्रपाली खरचाणे, आदिती अलाहीत, आरूष सरोदे, मुस्कान जैन, निधी जैन, धीरज मगरे, प्रकाश पाटील, जयेश निंबाळकर या खेळाडूंसोबत एकत्रीतरित्या (सायमन्स टेनिस) एकाच वेळी बुद्धिबळ खेळले. या स्पर्धेत साक्षी शुक्ला हिने ग्रॅड मास्टर अभिजीत कुंटे यांच्यासोबत बरोबरी साधली.

इंदोर येथील अखिल भारतीय स्तरावरील २००० आतील रेटिंग असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचे सानिया रफिक तडवी, तसीन रफिक तडवी यांनी यश प्राप्त केले. त्यामुळे त्यांचा अशोक जैन, अतुल जैन, अभिजीत कुंटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारूक शेख, सहसचिव शकिल देशपांडे, खजिनदार अरविंद देशपांडे, सदस्य तेजस तायडे, चंद्रशेखर देशमूख, प्रविण ठाकरे, रविंद्र धर्माधिकारी, संजय पाटील, प्रा. व्ही. डी. पाटील यांनी अशोक जैन यांचा सत्कार केला.

सूत्रसंचालन नंदलाल गादिया यांनी केले. चंद्रशेखर देशमुख यांनी आभार मानले. नथ्यू सोमवंशी, सोमदत्त तिवारी, आकाश धनगर, संजय काटोले, अजित घारगे, जयेश बाविस्कर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.


 

Next Post
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट 

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट 

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add