जळगाव, दि.२८ – खान्देश कॉलेज एजुकेशन संचलित मूळजी जेठा महाविद्यालयाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन प्रशालेच्या वतीने रोट्रॅक्ट क्लब चे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे डॉ.राजेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष योगेश भोळे, सेक्रेटरी विवेक काबरा, वाणिज्य प्रशालेचे प्रमुख डॉ.अनिल सरोदे, व्यवस्थापन प्रशालेचे प्रमुख सी.ए.अब्दुल अर्सिवाला, कार्यक्रम अधिकारी पल्लवी राणे, रोट्रॅक्ट कार्यक्रमाचे प्रमुख अंकिता महाजन उपस्थित होते.
यावेळी वाणिज्य आणि व्यवस्थापन प्रशालेचे दोन गट करण्यात आले. वाणिज्य प्रशालेतून रोट्रॅक्ट क्लब चे अध्यक्ष म्हणून उदित पाटील, सेक्रेटरी म्हणून वैष्णवी पाटील, खजिनदार म्हणून उर्वशी सैनी आणि इतर पदांसाठी सृष्टी दुबे, तनुजा सैनी, चेतन बाविस्कर, पूजा नारखेडे, तेजस्विनी अहिरे, विशाल अहिरे यांची निवड करण्यात आली. व्यवस्थापन प्रशालेतून अध्यक्ष म्हणून वैष्णवी कराड, उपाध्यक्ष म्हणून केतन पाटील, सेक्रेटरी म्हणून विद्या कळसकर आणि उप सेक्रेटरी म्हणून भाग्येश चौधरी आणि इतर पदांसाठी ऋषिकेश गुंड, अनुष्का काबरा, मुस्कान सिंघ, प्रेम सुरळकर, साकीना सैफी आणि अथर्व मंडपे यांची निवड करण्यात आली.
उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.राजेश पाटील म्हणाले कि, आपण सर्व या समाजात राहतो तर आपण समाजासाठी तन मन धन समर्पित करून काहीतरी करणे हे समाजाप्रती आपले कर्तव्य आहे. आपण लहानात लहान कामातून समाजाला चांगल्या गोष्टींसाठी मदत करणे तसेच प्रवृत्त केले पाहिजे. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले अपयशाने हरून जाऊ नका. आपला मार्ग काटेरी आहे पण त्यातूनच आपल्याला आपला रस्ता काढायचा आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉ. प्रदीप जोशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी वाणिज्य आणि व्यवस्थापन प्रशालेच्या सर्व प्राध्यापक वृंदाने सहकार्य केले.