• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य सैनिकांच्या समर कथांवर राष्ट्रीय नाटिका स्पर्धेचे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 22, 2022
in जळगाव जिल्हा
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे स्वातंत्र्य सैनिकांच्या समर कथांवर राष्ट्रीय नाटिका स्पर्धेचे आयोजन

जळगाव, दि.२२ – गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्य सैनिकांच्या समर कथांवर आधारित राष्ट्रीय नाटिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय नेतृत्वासोबतच स्थानिक स्वातंत्र्य सैनिकांचे योगदान अनमोल आहे. या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी तसेच आपला समृद्ध इतिहास पुढच्या पिढीसमोर ठेवण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेत शाळा अथवा महाविद्यालय आपल्या संघाची प्रवेशिका पाठवून सहभाग नोंदवू शकणार आहे. त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनावर आधारित वा त्यांच्या आयुष्यातील एका प्रसंगावर नाटिका तयार करणे अपेक्षित आहे. किमान ५-७ मिनिटांच्या या नाटिकेचे ध्वनिचित्रमुद्रण (व्हिडीओ) तयार करून दि. ३१ जुलै पूर्वी पाठविणे अपेक्षित आहे.

स्पर्धेचा निकाल दि.१५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ऑनलाईन कार्यक्रमात घोषित करण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश विनामूल्य असून प्रथम पाच यशस्वी स्पर्धक संघांना रोख पारितोषिके देण्यात येतील. अधिक माहितीसाठी गिरीश कुळकर्णी (९८२३३३४०८४) यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

Next Post
४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

४४ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडसाठी प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

ताज्या बातम्या

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती
गुन्हे

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती

April 11, 2026
जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group