जळगाव, दि.०७ – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील हायवेला लागून असलेल्या वाटिका आश्रम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील, अंबरनाथ येथील नगराध्यक्ष सुनील चौधरी, गजानन देशमुख, कुंदन काळे, भरत सोनवणे, किशोर सोनवणे, मनोज आहुजा, रियाज पटेल, हर्षल मावळे, खान्देश माळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर आर महाजन, गजानन महाजन, कृष्णा महाजन, दिलीप माळी, वसंत पाटील आदी उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षण करण्यासाठी अश्या प्रकारे वृक्षारोपण करून वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रयत्न करावे असे मनोगत खान्देश माळी महासंघाचे प्रदेश सचिव वसंत पाटील यांनी व्यक्त केले.