• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पोळ्यानिमित्त सर्जाराजासाठी ३१ शेतकऱ्यांना साज वाटप

बळीराजाप्रती व्यक्त करण्यात आली बांधिलकी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 22, 2021
in कृषी
0
पोळ्यानिमित्त सर्जाराजासाठी ३१ शेतकऱ्यांना साज वाटप

जळगाव, दि.२२-  देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर अनेक वर्षापासून आर्थिक, अस्मानी संकट निर्माण झाले आहेत. आता तर करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणखी संकटात सापडलेला आहे. येत्या पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कृषी क्षेत्राविषयी व बळीराजाप्रती बांधिलकी म्हणून सुमीरा गांधी परिवार आणि नेहरू चौक बहुद्देशीय मित्र मंडळातर्फे ३१ शेतकऱ्यांना पोळ्याचा साज वाटप करण्यात आला.

हा अनोखा उपक्रम गेली ७ वर्षे नेहरू चौक बहुउद्देशीय मित्र मंडळ व सुमिरा परिवार यांच्यातर्फे करण्यात येत आहे. उन्हातान्हाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे पोळा असून बैलाच्या सजावटीच्या साहित्याने बाजार फुलले आहेत. मात्र निसर्गाचा लहरीपणा आणि पिकांवरील रोग तसेच करोना संक्रमण यामुळे त्रस्त झालेले शेतकरी मात्र पोळा सणाकडे पाठ फिरवत आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना पोळ्यासाठी खर्च करणे शक्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत म्हणून पोळ्याचे साज देण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, चोपडा मतदारसंघाच्या आमदार लता सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, उद्योजक संजय गांधी, नेहरू चौक मंडळाचे अध्यक्ष अजय गांधी यांच्यासह शेतकरी रवींद्र गणपत पाटील उपस्थित होते.

सुरुवातीला आमदार भोळे यांनी शेतकऱ्यांप्रती सामाजिक बांधिलकी महत्वाची असल्याचे सांगत उपक्रमाचे कौतुक केले. यानंतर शेतकऱ्यांना दोर, नाथ, म्होरक्या, गोंडे, सुताची लटी, गेठा असा पोळ्याचा साज पर्यावरणपूरक थैलीसह मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आला.

प्रकाश आडते यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. कार्यक्रमासाठी रिकेश गांधी, पियुष गांधी, पंकज पाटील, रोहित शिरसाठ, दर्शन बारी, वैभव जगदाळे, धनंजय अमोदकर, प्रसाद विसपुते, शेखर सोनवणे, ऋषभ गांधी, चेतन माळी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.


 

Tags: Jalgaon newsKhandesh Prabhatखान्देश प्रभातजळगाव
Next Post
माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांना पाचोऱ्यात आदरांजली

माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांना पाचोऱ्यात आदरांजली

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर ‘Sunrise & Surrender’ उपक्रम उत्साहात
क्रिडा

जैन हिल्सवर ‘Sunrise & Surrender’ उपक्रम उत्साहात

September 30, 2026
रायफल शूटिंग स्पर्धेत आदित्य सोनवणेचे सुवर्ण; यश विभागीय स्पर्धेसाठी नाशिक येथे निवड
क्रिडा

रायफल शूटिंग स्पर्धेत आदित्य सोनवणेचे सुवर्ण; यश विभागीय स्पर्धेसाठी नाशिक येथे निवड

September 29, 2026
जामनेर येथे तेली समाज पंच मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
शैक्षणिक

जामनेर येथे तेली समाज पंच मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न

September 29, 2026
सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: १६ संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला
जळगाव जिल्हा

सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: १६ संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

September 29, 2026
एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई: दुचाकी चोरट्याला अटक, चोरीची मोटरसायकल हस्तगत

September 27, 2026
एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी
गुन्हे

एरंडोलच्या टोळीतील तिघांना जिल्हाबंदी

September 24, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add