• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जिल्ह्यात नायलॉन मांजावर कायमस्वरूपी बंदी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 6, 2022
in जळगाव जिल्हा
0
जिल्ह्यात नायलॉन मांजावर कायमस्वरूपी बंदी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश

जळगाव, दि. 06 (जिमाका) – मकर संक्रांत व इतर सणांच्या वेळेस पंतग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक किंवा इतर कृत्रिम वस्तूपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्या धाग्याची निर्मिती, आयात करणे, विक्री, साठवणूक व वापर करण्यास जळगाव जिल्ह्यात कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली असल्याने या मांजाची खरेदी, विक्री करू नये, अशा आशयाचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे, पक्ष्यांना प्राणघातक ठरणारा मांजा पतंग उडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. या मांजावर शासनाने बंदी घातली आहे. त्याची विक्री करणे, साठविणे व वापरणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे. अशा व्यक्ती अथवा व्यापाऱ्यांविरुध्द कारवाईची मोहीम वन विभागातर्फे उघण्यात आली आहे.

मकर संक्रात या सणाच्या व इतर वेळेस पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा प्लास्टिक किंवा इतर कृत्रीम वस्तूंपासून बनविलेल्या नायलॉन मांजा या नावाने परिचित असलेल्या पक्या धाग्याची निर्मिती, आयात करणे, विक्री, साठवणूक व वापर करण्यास संपूर्ण जळगाव जिल्ह्यात कायमस्वरुपी बंदी घालण्यात आलेली आहे. सदर नायलॉन मांज्याची खरेदी, विक्री करू नये. जळगाव जिल्ह्यातील सर्व घाऊक व्यापारी/किरकोळ व्यापारी/साठवणुकदारांना नायलॉन मांजाची विक्री व साठवणूक करण्यास प्रतिबंध करण्यात यावा.

या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सर्व स्थानिक संस्था व पोलिस विभागाने स्वतंत्ररीत्या पथके तयार करुन आवश्यक ती कार्यवाही करावी. या आदेशाचे कोणतीही व्यक्ती संस्थेने उल्लंघन केल्यास ही बाब ही पर्यावरण ( संरक्षण) अधिनियमान्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

Next Post
जिल्हा पत्रकार संघातर्फे ‘पत्रकार दिन’ साध्या पद्धतीने साजरा.. VIDEO

जिल्हा पत्रकार संघातर्फे 'पत्रकार दिन' साध्या पद्धतीने साजरा.. VIDEO

ताज्या बातम्या

जळगावच्या तरुणाची यावलजवळ निर्घृण हत्या; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
खान्देश

जळगावच्या तरुणाची यावलजवळ निर्घृण हत्या; दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

December 3, 2025
रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!
खान्देश

रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्रत्येक दात्याला हेल्मेटचे वाटप!

December 2, 2025
यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!
खान्देश

यावल नगर परिषद निवडणूक: मतदानासाठी महिलांचा ‘विक्रमी’ उत्साह!

December 2, 2025
अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!
खान्देश

अमूर्त शैलीतील ‘ग्रॅव्हिटी’ चित्र प्रदर्शन जळगावात!

December 2, 2025
वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!
खान्देश

वाळूमाफियांना रोखणाऱ्या तलाठ्याच्या कानशिलात लगावली, ‘टॉमी’ने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न!

December 2, 2025
शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन
जळगाव जिल्हा

शिवनेरी ग्रुपतर्फे रक्तदान शिबिर आणि कीर्तन सोहळ्याचे आयोजन

December 1, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group