• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव हादरले! मूल पळवण्याच्या अफवेतून तरुणाची ‘मॉब लिंचिंग’; आव्हाण्यात जमावाच्या मारहाणीत मृत्यू

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 24, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
जळगाव हादरले! मूल पळवण्याच्या अफवेतून तरुणाची ‘मॉब लिंचिंग’; आव्हाण्यात जमावाच्या मारहाणीत मृत्यू

जळगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील आव्हाणे शिवारात सोमवारी रात्री ‘मुलं पळवणारी टोळी’ सक्रिय असल्याच्या संशयावरून एका ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाला जमावाने लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या अमानुष मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत पाच संशयितांना ताब्यात घेतले असून परिसरात खळबळ उडाली आहे.

​जळगाव ते कानळदा रोडवरील आव्हाणे शिवारात ‘लक्ष्मी जिनिंग’ परिसरात सोमवारी (२३ फेब्रुवारी) रात्री ७ ते ८ वाजेच्या सुमारास एक अनोळखी तरुण वावरत होता. हा तरुण तिथे राहणारे मनोहर सोनवणे यांच्या ३ वर्षीय चिमुरड्याला पळवून नेत असल्याचा संशय काही स्थानिकांना आला. या संशयाचा वणवा इतक्या वेगाने पसरला की, काही वेळातच तिथे मोठा जमाव जमा झाला. ​जमावाने कोणत्याही प्रकारची खातरजमा न करता किंवा पोलिसांना पाचारण न करता संबंधित तरुणावर हल्ला चढवला. संतापलेल्या जमावाने त्याला जमिनीवर लोळवून बेदम मारहाण केली.

​घटनेची माहिती मिळताच आव्हाणे गावचे सरपंच पिंटू पाटील यांनी पोलिसांना कळवले. जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले तेव्हा तो तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. पोलिसांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला आणि शरीराच्या अंतर्गत भागाला गंभीर दुखापत झाल्याने मंगळवारी पहाटे ४:३० वाजता त्याची प्राणज्योत मालवली.

​याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पाच मुख्य संशयितांना ताब्यात घेतले आहे. यात मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा), अजय डोंगर कोळी (रा. थोरगव्हाण), प्रशांत उर्फ प्रकाश सोनवणे (रा. बामणोद), अजय उर्फ बादल सोनवणे (रा. बामणोद), अफताब आरिफ खाटीक (रा. शनिपेठ) यांचा समावेश आहे.

​”नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. अफवांवर विश्वास ठेवून कोणाचा जीव घेणे हा गंभीर गुन्हा आहे.” -जळगाव पोलीस प्रशासन
​

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
‘मह्य आंगन’मधून उमटले लेवा गणबोलीचे वैभव; उमविमध्ये काव्यसंग्रहाचे प्रकाशन

'मह्य आंगन'मधून उमटले लेवा गणबोलीचे वैभव; उमविमध्ये काव्यसंग्रहाचे प्रकाशन

ताज्या बातम्या

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती
गुन्हे

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती

April 11, 2026
जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group