• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 20, 2026
in जळगाव जिल्हा
0
भुसावळात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

​भुसावळ, (प्रतिनिधी) : येथील श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेतर्फे १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. शहरात आयोजित या सोहळ्यात करणी सेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करत त्यांच्या विचारांचा जागर केला.

​कार्यक्रमाची सुरुवात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित समाजबांधवांना संबोधित करताना दामोदर राजपूत म्हणाले की, “आजच्या काळात केवळ महाराजांचा जयघोष करून चालणार नाही, तर त्यांचे विचार आचरणात आणणे गरजेचे आहे. समाजातील प्रत्येक पालकाने आपल्या घराघरात शिवाजी राजे घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.”

​या सोहळ्याला करणी सेनेचे जिल्हा युवक अध्यक्ष संदीप राणा, महिला अध्यक्षा सारिका पाटील, जिल्हा सचिव मीना राजपूत, ज्येष्ठ समाजसेवक दिलीपसिंग पाटील, आनंदा पाटील, सुनील पाटील, दलजीत चौधरी, प्रशांत ठाकूर, चंदू चौहान, पवन मेहरा, भूषण राजपूत, गणेश राजपूत, वैशाली सावकारे, संध्या चौधरी, विजय राजपूत, तालुका अध्यक्षा कविता राजपूत, प्रमिला राजपूत, भाग्यश्री राजपूत, सविता राजपूत, संगीता राजपूत, प्रियंका राजपूत, सविता मोरे, अर्चना राजपूत, प्रतीक्षा राजपूत, श्रद्धा राजपूत, उज्वला राजपूत, गायत्री राजपूत, सपना राजपूत यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

​कार्यक्रमाच्या शेवटी सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराजांच्या चरणी वंदन केले. या उत्साही सोहळ्यामुळे परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
​

Tags: Bhusawal
Next Post
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

'दर्पण'कार बाळशास्त्री जांभेकर यांना 'गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा'तर्फे अभिवादन

ताज्या बातम्या

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती
गुन्हे

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावीत यांची नियुक्ती

April 11, 2026
जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेचा कचरा ठेकेदाराला दणका; उपमहापौर मनोज चौधरींच्या आक्रमक पवित्र्यानंतर अखेर नोटीस लागू

April 9, 2026
रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध
जळगाव जिल्हा

रिक्षा चालकांचा एल्गार; एलपीजी दरवाढ आणि कल्याणकारी मंडळाच्या जाचक अटींचा निषेध

April 9, 2026
सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

सामूहिक जपातून घुमला विश्वशांतीचा मंत्र; जैन इरिगेशनच्या हजारो सहकाऱ्यांचा सहभाग

April 9, 2026
जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा
जळगाव जिल्हा

जळगावात भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचा १७ वा सोहळा; १२ ला विराट रॅली तर १९ एप्रिलला महाशोभायात्रा

April 8, 2026
गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन
जळगाव जिल्हा

गॅस दरवाढ आणि सक्तीच्या नोंदणी विरोधात उद्या जळगावात रिक्षाचालकांचे आंदोलन

April 7, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group