• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश; लॉजिंगवर पोलिसांची धाड

तिघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
June 21, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश; लॉजिंगवर पोलिसांची धाड

यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील किनगाव गावातील यावल रस्त्यावर असलेल्या हॉटेल मनमंदिर लॉजिंगमध्ये वेश्या व्यवसायावर पोलिसांनी धाड टाकून महिलेची सुटका करून तिघांविरोधात यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे.

यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळालेल्या माहितीनुसार यावल-चोपडा रस्त्यावर किनगाव शिवारात मनमंदिर बारमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे समजले होते. पोलीस निरीक्षक यांनी त्याठिकाणी कारवाई करण्यासाठी सापळा रचला. बनावट ग्राहक आणि पंच पाठवून त्यांनी अगोदर याबाबत खात्री केली. गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास बनावट ग्राहक हॉटेलमध्ये पोहचला. वेश्या व्यवसायाची खात्री झाल्यावर ठरलेल्या नोटा त्याने काउंटरवर दिल्या. हॉटेलच्या तिसऱ्या माळ्यावर खोलीत हा धंदा सुरु होता. बनावट ग्राहकाने निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मोबाईलवर मिस कॉल देताच ते पथकासह त्याठिकाणी पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत हवालदार वासुदेव मराठे, अमित तडवी, सागर कोळी, एजाज गवळी, भारत कोळी, मिनाक्षी तडवी, अल्लाउद्दीन तडवी हे देखील होते.

हॉटेलमधील तिघांना ताब्यात घेत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली. या प्रकरणी यावल पोलिसात हवालदार वासुदेव मराठे यांच्या फिर्यादीवरून गोपाळ निंबा पाटील (वय २८,रा.दहिगाव), पराग प्रकाश लोहार (वय २४, रा. खेडी खुर्द ता.जळगाव) व समाधान शालिक तायडे (वय २२, रा.साकळी) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरून मोबाईल, रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहेत.

Next Post
उधना-पंढरपूर विशेष रेल्वेला मंजुरी : वारकऱ्यांसाठी खा. स्मिता वाघ यांचा यशस्वी पाठपुरावा!

उधना-पंढरपूर विशेष रेल्वेला मंजुरी : वारकऱ्यांसाठी खा. स्मिता वाघ यांचा यशस्वी पाठपुरावा!

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’
खान्देश

नितीन पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘पीएच.डी.’

March 13, 2026
महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
जळगाव जिल्हा

महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट: पुढील पाच दिवस ढगाळ हवामान, तर काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

March 13, 2026
घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन
जळगाव जिल्हा

घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात भरारी पथक स्थापन

March 11, 2026
विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम
जळगाव जिल्हा

विविध स्पर्धांतून उलगडले स्त्री जीवनाचे पैलू; ​जळगाव जिल्हा महिला असोसिएशनचा उपक्रम

March 10, 2026
दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण
गुन्हे

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण : अखेर व्यवस्थापक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण

March 10, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group