रावेर, (प्रतिनिधी) : तालुक्यातील निरुळ येथील अशोक देवीदास खैरे हा आजेसासऱ्यांचा दशक्रिया विधी आटोपून रावेरहून निरुळला दुचाकीने जात असताना त्याला समोरून आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. त्यात अशोक खैरे याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी १ वाजता घडली.
अशोक खैरे हे दशक्रिया विधी आटोपून रावेरकडून निरूळला दुचाकी क्रमांक (एमएच १९- ईआय ४८१९) ने घरी परत येत असताना समोरून आलेल्या दुचाकी क्रमांक (एमपी ६८ – एम ४२५६) वरील चालक सोपान गजानन भोई (वय ४५) याने धडक दिली. त्यात अशोक देवीदास खैरे (वय ३३) हा गंभीर जखमी झाला. दरम्यान त्याला भुसावळ येथे रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी रावेर पोलिसात मध्य प्रदेशातील मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.