• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पत्रकारिता क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर पूरक ठरेल.. -डॉ.युवराज परदेशी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 19, 2025
in जळगाव जिल्हा
0
पत्रकारिता क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर पूरक ठरेल.. -डॉ.युवराज परदेशी

जळगाव, (प्रतिनिधी) : कृत्रिम बुद्धिमत्तेचा माध्यम क्षेत्रात बहुविध पद्धतीने वापर करून वेग आणि मजकुराची गुणवत्ता राखता येत असल्याने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) माध्यम क्षेत्रासाठी पूरकच ठरेल, असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. युवराज परदेशी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर समिती सदस्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

यावेळी राज्य समितीचे अध्यक्ष यदु जोशी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे, किशोर गांगुर्डे, दयानंद कांबळे, कृत्रिम तंत्रज्ञान विषयक तज्ज्ञ तुषार भामरे, यांच्यासह समितीचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी, रजत भोळे, चेतन गिरणारे उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. परदेशी म्हणाले की, वेगवेगळ्या क्षेत्रात आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान उपयोगात आणले जात आहे. पत्रकारिता क्षेत्रातही त्याचा उपयोग होत आहे. माहितीचे विश्लेषण, संदर्भ मिळवण्यासाठी आणि कमीत कमी वेळात ती माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.

एकाच विषयावरील माहितीचे अनेकप्रकारे विश्लेषण एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करता येते. बातमी लेखन करताना ते उपयुक्त ठरणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

राज्य समितीचे अध्यक्ष श्री. जोशी यांनी, एआय तंत्रज्ञानाचा उपयोग हा पत्रकारितेत सकारात्मक पद्धतीने आवश्यक आहे. पत्रकाराची बातमी लिहितानाची संवेदना यासाठी एआय तंत्रज्ञान पर्याय ठरू शकत नाही. पत्रकाराचा अभ्यास, संवेदनशीलता, बातमी शोधण्याचे कसब याची तंत्रज्ञानाशी सांगड घातल्यास प्रभावी पत्रकारिता करता येते, असे सांगितले.

यावेळी डॉ. परदेशी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यम क्षेत्रातील उपयोगाबाबत विविध पैलूंची माहिती दिली.


Next Post
इनरव्हील क्लब जळगावची वृद्धाश्रमास भेट

इनरव्हील क्लब जळगावची वृद्धाश्रमास भेट

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group