• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

पिंप्राळ्यातील व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाचा संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांनी घेतला आक्षेप

जळगाव शहरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 18, 2025
in गुन्हे
0
पिंप्राळ्यातील व्यसनमुक्ती केंद्रात तरुणाचा संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांनी घेतला आक्षेप

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील पिंप्राळा भागातील मयूर कॉलनीत असलेल्या एका व्यसनमुक्ती केंद्रात शुक्रवारी दि. १७ जानेवारी रोजी एका तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. याबाबत नातेवाईकांनी आक्षेप घेतला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

चेतन विकास अत्तरदे (वय ३२, रा. विठोबा नगर, खेडी रोड, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, ७ वर्षांचा मुलगा यांचेसह राहत होता. काही महिन्यांपूर्वी त्याने मुंबई येथे असलेली नोकरी सोडून जळगावात आला होता. चेतनच्या नातेवाईकानी दिलेल्या माहितीनुसार, चेतनला त्याचे आई वडील पिंप्राळ्यातील व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन आले होते. तेथून त्याचे कपडे आणण्यासाठी म्हणून ते घरी गेले असता त्यांना, चेतनला शासकीय रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळाली. दरम्यान, चेतनला कोणतेतरी इंजेक्शन दिले व त्याचा साईडइफेक्ट होऊन त्याचा मृत्यू झाला असे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

तर दुसरीकडे, सद्भाव व्यसनमुक्ती केंद्रात संचालक अशोक शुक्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, चेतन व त्याचे २ ते ३ मित्र हे केंद्रात आले होते. त्यावेळी चर्चा झाल्यावर चेतन हा केंद्रात झोपून गेला. काही वेळाने त्याला उठविले असता तो उठला नाही. तेव्हा केंद्रातील भूषण पाटील व कर्मचाऱ्यांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मयत घोषित केले, अशी माहिती शुक्ला यांनी दिली आहे. तर शासकीय रुग्णालयात मृतकाच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे. सदर मृत्यू हा संशयास्पद असल्याने शवविच्छेदनासाठी ठेवण्यात आला आहे. दरम्यान, रामानंद नगर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

Next Post
महावितरण कडून १४५० वीज मीटरची तपासणी ; २०३ जणांवर कारवाई

महावितरण कडून १४५० वीज मीटरची तपासणी ; २०३ जणांवर कारवाई

ताज्या बातम्या

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

राष्ट्रसंत गाडगे महाराज जयंतीनिमित्त ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 23, 2026
लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात
जळगाव जिल्हा

लेखन संस्कृती जपत शिवविचारांचा जागर; योगमाया प्रतिष्ठानची भव्य निबंध स्पर्धा उत्साहात

February 23, 2026
लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’
जळगाव जिल्हा

लोकनेते डॉ. उल्हासदादा पाटील: आरोग्य आणि शिक्षणाच्या पंढरीचा ‘उल्हास’

February 23, 2026
शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात
जळगाव जिल्हा

शॉर्ट सर्किटमुळे संसार खाक झालेल्या कुटुंबाला ‘लिनेस क्लब’चा मदतीचा हात

February 21, 2026
जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ
खान्देश

जळगावात २६ फेब्रुवारीपासून ‘खान्देश महोत्सव’चा जागर; महिला बचत गटांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ

February 21, 2026
‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन
जळगाव जिल्हा

‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना ‘गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघा’तर्फे अभिवादन

February 20, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group