जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील मेहरूण परिसरात दुचाकी चोरणाऱ्या दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक दयाराम रूम (वय ३४) व दिपक एकनाथ शैले (वय ३१, रा. रेणुकानगर, जळगाव) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
मेहरूण परिसरात राहणाऱ्या सहाजीब हबीब खाटीक यांची दुचाकी (एम.एच.१९ एआर ५३४७) ही ११ जानेवारी रोजी रात्री घरासमोरून चोरीला गेल्यावर त्यांनी यासंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संशयित दिपक रम आणि दिपक शैले या दोघांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई एमआयडीसी पोलीसांच्या पथकाने केली.