• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते ; नर्सिंगचे द व्हाइटल व्हॉईस द्वितीय

राज्यस्तरीय परिषदेनिमीत्त उपक्रम

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 15, 2025
in जळगाव जिल्हा
0
रूद्राक्ष टीमचे कुटुंब नियोजन पथनाट्य ठरले प्रथम विजेते ; नर्सिंगचे द व्हाइटल व्हॉईस द्वितीय

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्फे विविध सामाजिक विषयांवर आधारीत पथनाट्य स्पर्धेत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची रूद्राक्ष टीम विजेता ठरली. तर गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचे द व्हाइटल व्हॉईस या टीमचे पथनाट्य उपविजेते ठरले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दि. १७ ते १९ जानेवारी या कालावधीत आयएपीएसएम आणि आयपीएचएतर्फे २६ वी वार्षिक राज्यस्तरीय संयुक्त परिषद होणार आहे. या परिषदेच्या आयोजनाच्या निमीत्ताने बुधवारी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालय परिसरात विविध सामाजिक विषयांवर पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत चार संघांनी सहभाग घेतला. त्यात डॉक्टरांवर होणारे हल्ले या विषयावर एमबीबीएसच्या नटरंग टीमने पथनाट्य सादर केले. आयुर्वेद प्रकृती का योगदान यावर चरक या टीमने पथनाट्य सादर केले. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या द व्हायटल व्हाईस या टीमने कौटुंबिक हिंसाचार यावर तर एमबीबीएसच्या रूद्राक्ष टीमने कुटुंब नियोजन या विषयावर पथनाट्य सादर करून विविध सामाजिक संदेश दिले. परीक्षक म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडीत, बालरोग शल्यचिकीत्सक डॉ. मिलींद जोशी, डॉ. यादव यांनी काम पाहिले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी पथनाट्य सादर करणार्‍यांचे कौतुक करून विद्यार्थ्यांमधील उत्साह आणि कल्पकता या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन चेतना आहेर व प्रथमेश गव्हाळे यांनी केले.

रूद्राक्षचे कुटुंब नियोजन विजेते..
स्पर्धेत चारही टीमने सादर केलेले पथनाट्य हे दर्जेदार होते. परीक्षकांनी कुटुंब नियोजन ह्या रूद्राक्ष टीमला विजेता तर नर्सिंग महाविद्यालयाचे द व्हायटल व्हाईस उपविजेता म्हणून घोषित केले. विजेत्या स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील व डॉ. सुहास बोरले यांच्या हस्ते रोख बक्षीस व प्रमाणपत्र देण्यात आले.

या कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत साळुंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, डीन डॉ. आर.के. मिश्रा, डॉ.जयवंत नागूलकर, डॉ. हर्षल बोरोले, डॉ. नीलेश बेंडाळे, डॉ. माया आर्विकर, डॉ. दिलीप ढेकळे, प्रा. डॉ. बापूराव बीटे, प्रा. पियूष वाघ, प्रवीण कोल्हे, भवानी वर्मा, विजय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.


Next Post
गॅस सिलिंडरसह ३१ हजारांचे साहित्य जप्त ; चाळीसगाव पोलिसांची कारवाई

चोरट्यांची घरफोडी सुरूच ; बंद घर फोडून मुद्देमाल लंपास

ताज्या बातम्या

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता
क्रिडा

प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा पंजाब संघ विजेता

July 12, 2025
राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश
जळगाव जिल्हा

राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का: डॉ. नितीन पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

July 12, 2025
आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप
जळगाव जिल्हा

आर.आर. विद्यालयात विद्यार्थ्याच्या मृत्यूने खळबळ: मारहाणीचा नातेवाईकांचा आरोप

July 12, 2025
जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

जळगावातील नामांकित हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, १९.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 12, 2025
जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव
जळगाव जिल्हा

जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आरोग्य केंद्रांचा गौरव

July 11, 2025
पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव जिल्हा

पाडळसरे येथे तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

July 11, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group