पाचोरा, (प्रतिनिधी) : गेल्या दहा वर्षात पाचोरा-भडगाव मतदार संघात आ. किशोर आप्पा पाटील यांनी चौफेर विकास केला आहे. रस्ते, वीज, पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तर पाचोरा व भडगाव शहरात झालेले विकास कामे आश्वासक आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील मतदारांकडून त्यांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी सांगीतले.
पाचोरा-भडगाव मतदार संघात आ. किशोर आप्पा पाटील यांनी प्रचंड विकास कामे केली आहे. विरोधक त्याबद्दल बोलू शकत नाही. त्यामुळे इतर काही मुद्दे नसल्याने ते ‘विकास’ वरून निवडणुक इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करत आहे. पण मतदारसंघातील जनता ही सुज्ञ आहे, ते विकासाच्या बाजूने म्हणजेच किशोरआप्पा पाटील यांना मतदान करतील असा विश्वास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केला.
‘गिरणे’ वरील पुल अंतिम टप्प्यात..
भडगाव शहरात जुन गाव ते पेठ भागाला जोडण्यासाठी बर्याच दिवसापासून पूलाची मागणी होती. त्या अनुशंगाने सातत्याने पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविण्याला यश आले असून पुलाचे काम सुरू आहे. याशिवाय भडगाव ते वाक पुलाचे कामे ही अंतिम टप्प्यात आले आहे. तर पाढंरद ते निंभोरा, गुढे ते नावरे हे पुर वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. याशिवाय माहेजी ते हनुमंखेडा, बांबरुड बु. ते बांबरुड खु., भातखंडे खु. ते भातखंडे बु. हे पुल ही मंजुर झाले आहेत. गिरणा नदिवर तब्बल सात पूल मंजुर करण्याचे ऐतिहासिक काम आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे. या बरोबरच दोघ बाळद ला जोडण्यासाठी तितुर नदिवर महत्वाचा पुलाचे काम पुर्णत्वास नेण्याचे काम आप्पांनी केले. यामुळे वाहतुकीचा फेरा वाचला आहे.
विजेचा प्रश्न निकाली काढला..
२०१४ अगोदर भडगाव तालुक्यात भडगाव, कजगाव व कोळगाव येथेच ३३/११ केव्ही चे सबस्टेशन होते. त्यांनी चाळीसगाव, पारोळा व पाचोरा येथून वीजपुरवठा होत होता. मात्र आमदार किशोर पाटील यांनी कोठली १३२ के.व्ही.चे सबस्टेशन याशिवाय वडजी, लोणपिराचे, वडधे येथे ३३/११ उपकेंद्र मंजुर करून कार्यान्वित केले. वाड्याचे ३३/११ सबस्टेशन ही मंजुर करण्यात आले आहे. तर गुढ्याचे ३३/११ सबस्टेशन प्रस्तावित आहे. याशिवाय कोळगाव येथे अतिरिक्त ५ एमव्हीए चा ट्रांसफार्मर बसवला आहे. पाचोरा तालुक्यात माहेजी, तारखेडा ३३/११ केव्ही चे काम पुर्ण झाले आहेत. तर कोल्हे-अटलगव्हाण,खेडगाव येथे ३३/११ केव्हीचे सबस्टेशन मंजुर आहेत. यामुळे उच्च दाबाने वीज मिळायला लागली. भडगावसह पाचोरा तालुका विजेच्या बाबतीत स्वयंपुर्ण करण्याचे काम आमदार किशोर पाटील यांनी केल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगीतले.
गडद, हीवरा अन् तितूर वरील बंधारेममुळू शेती झाली समृध्द
नगरदेवळा-बाळद गटात गडद व तितूर नदिवर तब्बल १९ बंधारे पुर्ण करून शेती समृध्द करण्याचे काम आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले आहे. दिघी येथे २, वडगाव १, नेरी ते खाजोळा दरम्यान ६, भोरटेक ते टाकुन दरम्यान ३, होळ-घुसर्डी २, संगमेश्वर १, वडगाव, बाळद, नाचनखेडा,लोहटार, बांबरुड दरम्यानच ४ बंधारे पूर्ण झाले आहेत. हीवरा नदिवर ३ बंधारे पुर्ण झाले आहेत.तर संगमेश्वर १ बंधारा मंजूर केला आहे. या बंधाऱ्यामुळे याभागातील शेती समृध्द झाली आहे. या परीसरातील शेतकऱ्यांच्या चेहर्यावर आनंद पहायला मिळत आहे. त्यामुळे हे शेतकरी स्वत: किशोरआप्पासाठी मैदानात उतरल्याचे रावसाहेब पाटील यांनी सांगीतले.