• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बेरोजगार तरूणांच्या हातांना काम देण्याचे वचन

आ.किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ खा. श्रीकांत शिंदे यांची भडगावात सभा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 14, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
बेरोजगार तरूणांच्या हातांना काम देण्याचे वचन

शिंदे साहेबांवर टीका करणाऱ्यांनी कोरोना काळात खिचडीत सुध्दा भ्रष्टाचार केला.. खा. श्रीकांत शिंदे

भडगाव, (प्रतिनिधी) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किशोर आप्पा पाटील निवडून आले तर हा मतदारसंघ दत्तक घेण्याचे वचन दिले आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासाची चिंता करू नको. कारण मुख्यमंत्री जे बोलतात ते करतात. येथील एमआयडीसीत उद्योग आणून बेरोजगार तरूणांच्या हातांना काम देण्याचे वचन ही यानिमित्ताने आपल्याला देतो असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते खा. डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी केले. ते महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारार्थ भडगाव येथे शेतकरी सहकारी संघाच्या प्रांगणात आयोजित सभेत बोलत होते.

डाॅ.श्रीकांत शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यावर साडेसात हजार रूपये टाकण्यात आले आहेत. यामाध्यमातून महीलांना सक्षम करण्याचे काम मुख्यमंत्र्यानी केले आहे. या लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रात भावा बहीणीच एक वेगळ नात निर्माण झाल आहे.

विरोधकांकडून या योजनेची टिंगल करण्यात येत होती. मात्र ज्यांना फक्त ‘माझ कुटुंब आणि माझी जबाबदारी’ एवढच माहीत आहे. त्यांना या १५०० रूपयाचे महत्व काय समजेल? असा प्रश्न उपस्थित केला. महायुतीचे सरकार आल्यावर या लाडकी बहीणांच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला २१०० रूपये पडणार आहेत. उलट जे शिंदे साहेबांवर टीका करतात त्यांनी कोरोना काळात खिचडीत सुध्दा भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे ते काय बोलतील?

मुख्यमत्र्यांचा प्रवास हा रिक्षा चालक ते मुख्यमंत्री असा राहीला आहे. त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांची जाण आहे. जे लोक बाळासाहेबांची मिमिक्री करायचे आज त्यांना पक्षात घेऊन खांद्यावर बसविण्याचे काम काही जण करत आहे, असेही त्यांना निकालानंतर मिमिक्रीचेच काम कर असा टोला ‘उबाठा’ च्या नेत्या सुषमा अंधारे यांचे नाव घेता लगावला.

यावेळी व्यासपीठावर भाजपच्या गुजरात मधील निंबायत मतदार संघाच्या आमदार संगीता पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य विकास पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, भाजपचे विधानसभा संयोजक अमोल पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डाॅ.विशाल पाटील, प्रवक्ते प्रदिप देसले, डॉ.प्रियंका पाटील, शहरप्रमुख बबुल देवरे, तालुकाप्रमुख संजय पाटील, सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष संजय गोहील, समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, रिपाईचे तालुकाध्यक्ष एस.डी. खेडकर, सुरेंद्र मोरे, शशिकांत येवले, पी.ए.पाटील, युवा नेते सुमित पाटील, युवासेनेचे जितेंद्र जैन, लखीचंद पाटील, आबा चौधरी विकास पाटील ,प्रवक्ते उल्हास आवारे , नंदु सोमवंशी, इमरान अली सैय्यद, वासिम मिर्झा, आनंद जैन, एकलव्य संघटनेचे धर्मा बाविस्कर, दशरथ मोरे, जहागिर मालचे आदि उपस्थीत होते.

विरोधकांना हीशोब घेण्याचा अधिकार नाही- आ. किशोर पाटील
परवा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सभेत चार हजार कोटीचे कामे सांगतीले तर विरोधकांनी एक हजार कोटी कुठे गेले म्हणून रान उठवले. मात्र विरोधकांना सांगू इच्छितो की, तुम्ही साधी मुतारी बांधली नाही. तुम्हांला अधिकार तरी आहे का? हीशोब मागायचा. तरी सांगतो. मी जे कामे केले आहे ते ३ हजार कोटीचे तर एक हजार कोटीचे कामे हे पाईपलाईन मधे आहेत. त्यामुळे निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही कामे सुरू आहेत. विरोधकांनी विकास कामावर बोलावे. मात्र त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नसल्याने काही तरी उकरून काढण्याचे काम ते करतात. जुवार्डी पाझर तलावाचा अनेक वर्षांपासून रखडेला प्रश्न मी सोडविला. पाचोरा-भडगाव तालुक्यातील अतिक्रमित घरे नियमीत करण्यासाठी मी प्रयत्न केले. मैत्रीये वरून काहींनी राजकारण सुरू केले आहे. मात्र मी गेल्या ७ वर्षांपासून या विषयावर काम करत आहे. आता हा विषय अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील ४९ लाख ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळणार आहे. आदिवाशी प्रकल्प कार्यालय भडगाव तालुक्यात करण्यासाठी प्रयत्न करत आहे. ते अंतिम टप्प्यात आहे. त्याला शासन आल्यावर मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केली. दरम्यान डाॅ.प्रियंका पाटील यांनी उबाठा च्या उमेदवार याच्यांवर चांगलाच हल्ला चढविला.

पाचोरा-भडगाव मतदारसंघावर मुख्यमंत्र्याचे विशेष लक्ष.. -डाॅ.श्रीकांत शिंदे
किशोर आप्पा हे मुख्यमंत्री साहेबांचे मानसपुत्र आहेत. त्यामुळे. ते निवडून आल्यानंतर हा मतदारसंघ दत्तक घेणार आहेत. म्हणून विकास कामाच्या बाबतीत कोणीही चिंता करायचे काम नाही. महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीत देशात नंरब एकवर आहे. त्यामुळे येथे मंजुर असलेल्या एमआयडीसीत मोठे उद्योग आणून लाडक्या भावांना रोजगार देण्याचे वचन मी देतो. याशिवाय गिरणा नदिवर प्रलंबित बंधार्याचा प्रश्न ही मार्गी लावू अशी ग्वाही डाॅ.श्रीकांत शिंदे यांनी दिली.


 

Next Post
माजी खा. ईश्वर जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी दिले ‘विजयी भव’ चे आशीर्वाद

माजी खा. ईश्वर जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी यांनी दिले 'विजयी भव' चे आशीर्वाद

ताज्या बातम्या

जळगाव महापालिकेसाठी रणधुमाळी सुरू! युती तुटल्यास सर्व ७५ जागा स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज
खान्देश

जळगाव महापालिकेसाठी रणधुमाळी सुरू! युती तुटल्यास सर्व ७५ जागा स्वबळावर लढण्यास भाजप सज्ज

December 16, 2025
राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
खान्देश

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

December 15, 2025
ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!
खान्देश

ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!

December 15, 2025
खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!
खान्देश

खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

December 15, 2025
निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय
खान्देश

निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय

December 15, 2025
जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?
खान्देश

जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?

December 13, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group