• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लाडक्या बहिणी मविआचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही.. – मुख्यमंत्री शिंदे

पाचोरा भडगाव मतदार संघ दत्तक घेण्याचं दिलं आश्वासन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 12, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
लाडक्या बहिणी मविआचा करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही.. – मुख्यमंत्री शिंदे

विजय बाविस्कर | पाचोरा, (प्रतिनिधी) : लाडकी बहीण योजनेला ब्रेक लावू असे म्हणणार्‍या महाविकास आघाडीचा लाडक्या बहिणी करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. तर आपले महायुतीचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहीणींना १५०० वरून २१०० रूपये प्रति महीना देऊ असे वचन यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना दिले.

ते महायुतीचे पाचोरा-भडगाव मतदार संघाचे उमेदवार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजीत ‘विजयी निर्धार’ सभेत बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आमच्याकडे देना बँक आहे तर विरोधकांकडे फक्त लेना बँक आहे. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. मात्र विरोधक फक्त बोलतात कृतीत आणत नाही. त्यामुळे तुमच्या योजना बंद पाडू असे म्हणणार्‍यांना आपण निवडून द्याल का? असा सवाल त्यांनी केला.

याशिवाय लाडक्या बहीणींचा डिसेंबरचा हप्ता आपले सरकार आल्याबरोबर पुढच्या महीन्यात खात्यात जमा करू महायुतीने शेतकऱ्यांना वीज बील मोफत केले आहे. तर मुख्यमंत्री सन्मान निधी ६ हजार रूपये देऊन बळीराजाचा सन्मान केला आहे. लाडका भाऊ योजनेतून तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे सरकार आल्यावर या विद्यार्थ्यांना प्रतिमहीना १० हजार रूपये देणार आहेत. तर कोरोना काळात काही जण घरात बसून, टीव्हीच्या माध्यमातून लोकांमधे होते. मात्र आम्ही त्यावेळी पीपीई कीट घालून लोकांचे दुख: समजुन घेत होतो. त्यांना मदत करत होता. असा टोला माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान त्यांनी आपल्या भाषणाची सुरवात ही अहिराणी भाषेतून करत उपस्थितांची मने जिंकली.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या आगमनापूर्वी रवींद्र पाटील, राजेंद्र मोरे, विनोद बागुल, शिवसेनेचे प्रवक्ते प्रदीप देसले आदींनी मनोगत व्यक्त करत आमदार किशोर आप्पा पाटील यांना साथ देण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संदिप केदार यांनी तर आभार प्रविण ब्राम्हणे यांनी मानले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे निरीक्षक तथा गांधीनगरचे उपमहापौर प्रेमळसिंह गोल, खा. स्मिता वाघ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनील पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर काटे, जिल्हा कोषाध्यक्ष कांतीलाल जैन, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आनंद खरात, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे, जि.प. माजी सदस्य विकास पाटील, डी. एम. पाटील, भाजपचे माजी शहराध्यक्ष नंदू सोमवंशी, बाजार समिती सभापती गणेश पाटील, उपसभापती पी.ए.पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, शशिकांत येवले, भाजपचे विधानसभा संयोजक अमोल पाटील, तालुका सरचिटणीस अनिल पाटील, संजय गोहील, सुनीता पाटील, युवती सेनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ प्रियंका पाटील, युवानेता सुमित पाटील, शिवसेनेचे भडगाव तालुकाप्रमुख संजय पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ.विशाल पाटील,भडगाव शेतकी संघाचे भैय्यासाहेब पाटील, रिपाईचे तालुकाध्यक्ष एस.डी.खेडकर, शिवसेनेचे शहरप्रमुख अजय चौधरी, बबलू देवरे, युवराज पाटील, किशोर संचेती, प्रा.चंद्रकांत धनवडे, नंदू पाटील, राजेश पाटील, समाधान पाटील, प्रवीण पाटील, शहर प्रमुख सुमित सावंत, शरद पाटे, युवासेनेचे लखीचंद पाटील, जितेंद्र जैन, समाधान पाटील, सुधाकर पाटील, जगदीश पाटील, सुनील पाटील, रवींद्र पाटील, प्रमोद सोमवंशी, अविनाश कुडे, इंदल परदेशी, हेमंत चव्हाण बापू हटकर, भाजपच्या रेखा पाटील, महिला आघाडीच्या नंदा पाटील, माया केदार उपस्थित होते.

किशोरआप्पा माझा मानसपुत्र, मी हा मतदार संघ दत्तक घेणार.. – मुख्यमंत्री
किशोरआप्पा पाटील हा माझा मानसपुत्र आहे. त्यामुळे त्याची हॅट्रीक करून दिली, तर मी हा मतदारसंघ दत्तक घेणार आहे. येथील प्रलंबित गिरणा नदिवरील बंधाऱ्यांसाठी निधी देऊन ते पुर्ण करू, मंजुर एमआयडीसीत नविन उद्योग आणून तरूणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे वचन मी या निमित्ताने देतो तसा ही किशोरआप्पा हा विकासाला पक्का आहे असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. तर आजची सभेला आलेली गर्दी पाहून किशोर पाटलांचा विजय निश्चित आहे. तर आप्पा हा विकास कामात वाघ असल्याचेही त्यांनी सांगीतले.

महायुतीचे एकमेव उमेदवार किशोरआप्पा.. – गिरीश महाजन
दरम्यान या विजय निर्धार सभेत काहीसे उशिराने पोहोचलेले भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यानंतर आभार प्रदर्शन करत असताना पाचोरा मतदारसंघातील नागरिकांनी कोणताही संभ्रम न बाळगता महायुतीचे एकमेव उमेदवार किशोर आप्पा पाटील हेच असल्याचे ठासून सांगितल्यामुळे महायुती मधील समन्वय पुन्हा एकदा दिसून आला. मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतच त्यांनी जाहीर मंचावरून आमदार किशोर आप्पा पाटील यांनाच विजयी करण्याचे जनतेला आवाहन केल्यामुळे त्यांच्या नावाने विविध वावड्या उठवणाऱ्या मध्ये मात्र यामुळे निराशा पसरल्याचे दिसून आले.

लाडक्या बहिणीकडून मुख्यमंत्र्यांचे औक्षण..
सभास्थळी आगमन होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पाचोरा भडगाव मतदार संघातील लाडक्या भगिनींनी ठिकठिकाणी औक्षण केले. सभास्थळी प्रवेशद्वारावरच महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण करत त्यांच्यावर फुलांची उधळण केली. तर मंचावर माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील डॉ. प्रियंका पाटील, शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख नंदा पाटील, आरपीआयच्या प्रियंका सोनवणे, शिवसेनेच्या संगीता साळुंखे, माया केदार, भाजपाच्या रेखा पाटील आदी महिला भगिनींनी मंचावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे औक्षण केले.

VIDEO


Next Post
रथोत्सवाला उपस्थिती देऊन आमदार भोळे यांनी घेतले दर्शन

रथोत्सवाला उपस्थिती देऊन आमदार भोळे यांनी घेतले दर्शन

ताज्या बातम्या

रस्तालुटीच्या तयारीत असलेले ७ सराईत गुन्हेगार चोपडा पोलिसांच्या जाळ्यात; गावठी कट्टे, तलवारी जप्त
खान्देश

रस्तालुटीच्या तयारीत असलेले ७ सराईत गुन्हेगार चोपडा पोलिसांच्या जाळ्यात; गावठी कट्टे, तलवारी जप्त

October 29, 2025
आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन
खान्देश

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन

October 28, 2025
सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण
जळगाव जिल्हा

सोने-चांदीच्या दरात विक्रमी घसरण; ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण

October 28, 2025
स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी
जळगाव जिल्हा

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

October 28, 2025
जळगावच्या देवयानी पाटीलची रत्नागिरीत चमकदार कामगिरी! तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक
क्रिडा

जळगावच्या देवयानी पाटीलची रत्नागिरीत चमकदार कामगिरी! तायक्वांडो अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक

October 28, 2025
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; ९ तोळे सोने, रोख रकमेसह ऐवज लंपास
खान्देश

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यावर चोरट्यांचा डल्ला; ९ तोळे सोने, रोख रकमेसह ऐवज लंपास

October 28, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group