• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव देवकरांची प्रचार रॅली नव्हे तर विजयी मिरवणूक…!

ममुराबाद-विदगाव भागात ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 10, 2024
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव देवकरांची प्रचार रॅली नव्हे तर विजयी मिरवणूक…!

जळगाव, (प्रतिनिधी) : विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचा ममुराबाद-विदगाव भागात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत अक्षरशः विजयी मिरवणुकीचा थाट होता. नागरिकांनी ठिकठिकाणी त्यांचे ढोल-ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषात स्वागत केले. काही ठिकाणी त्यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली.

गुलाबराव देवकर यांनी ममुराबादसह विदगाव, धामणगाव, आवार, तुरखेडा, धामणगाव, खापरखेडा, नांद्रा खुर्द, डिकसाई, रिधूर, घार्डी, आमोदा, करंज, नंदगाव, नांद्रा बुद्रुक आदी गावांना प्रचार रॅलीच्या माध्यमातून भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांनी ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. संधी मिळाल्यानंतर समस्या सोडविण्यास विशेष प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही देखील दिली. दरम्यान, ममुराबाद येथील नागरिकांनी माजी मंत्री देवकर यांना गावातून जमा करण्यात आलेली एक लाखांची वर्गणी सोपवली.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती लक्ष्मण पाटील, संचालक मनोज चौधरी, दिलीप पाटील, योगराज सपकाळे, गोकूळ चव्हाण, डॉ.अरूण पाटील, राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, तालुकाध्यक्ष बापू परदेशी, युवक तालुकाध्यक्ष विनायक चव्हाण, सामाजिक न्यायचे दत्तू सोनवणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोज चौधरी तसेच ममुराबाद येथील विकासोचे चेअरमन अनिल पाटील, संचालक अशोक गावंडे, बाळकृष्ण पाटील, आधार शिंदे, शरद पाटील, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील, नांद्रा बुद्रुकचे माजी सरपंच शांताराम पाटील, नांद्रा खुर्दचे माजी सरपंच उत्तम पाटील, विक्रम शिंदे, असोदा येथील हेमंत पाटील, धवल पाटील, खापरखेड्याचे राजू सोनवणे, धामणगावचे संतोष कोळी, सुभाष कोळी, दीपक कोळी, विलास भालेराव, तुरखेडा येथील गिरीश कोळी, भास्कर कोळी, आवार येथील मनोहर पाटील, शालीक कोळी, विदगाव येथील रवींद्र कोळी, आबा कोळी, गोविंद कोळी, डिकसाईचे गोरख चव्हाण, वसंत कोळी, संतोष पाटील, रिधूर येथील समाधान कोळी, सागर कोळी, आमोदा येथील नवल पाटील, घार्डी येथील कैलास कोळी, सावखेड्याचे चेतन कोळी, करंजचे हिलाल पाटील, कठोरा येथील नाना पाटील, भोकरचे छोटू सरकार, नंदगावचे मुकेश पाटील आदी उपस्थित होते.

ममुराबाद गाव दत्तक घेण्याची ग्वाही..
निवडणूक प्रचार रॅली दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी ममुराबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन केले. प्रति जेजुरी खंडेराव देवस्थानाचेही त्यांनी दर्शन घेतले. दत्त मंदिर चौकात नागरिकांनी केलेल्या सत्काराला उत्तर देताना सेवेची संधी मिळाल्यास ममुराबाद गाव दत्तक घेऊन त्याचा चेहरामोहरा बदलणार असल्याची ग्वाही माजी मंत्री देवकर यांनी दिली.


 

Tags: #political
Next Post
गावागावात गुलाबभाऊंच्या भगव्या वादळाची तुफान लाट

गावागावात गुलाबभाऊंच्या भगव्या वादळाची तुफान लाट

ताज्या बातम्या

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
खान्देश

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

December 15, 2025
ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!
खान्देश

ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!

December 15, 2025
खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!
खान्देश

खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

December 15, 2025
निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय
खान्देश

निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय

December 15, 2025
जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?
खान्देश

जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?

December 13, 2025
‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन
खान्देश

‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन

December 12, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group