जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी दि.५ रोजी सकाळी तपस्वी हनुमान मंदिर, शाहूनगर येथून सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. यावेळी माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
सदर प्रचार रॅली प्रभाग क्रमांक सहा मधील शाहूनगर, जेडीसीसी बँक कॉलनी, पोलीस ग्राउंड, प्रताप नगर, गिरणा वसाहत, इंडिया गॅरेज, तुकाराम वाडी, जानकी नगर, गणेश वाडी, भास्कर मार्केट, पोलीस मुख्यालय गणेश नगर, दंगल ग्रस्त कॉलनी या ठिकाणी काढण्यात येणार आहे. तसेच दुपारी तीन ते सातच्या दरम्यान गोलाणी मार्केट, फुले मार्केट येथे प्रचार रॅली होणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जळगाव शहरांमधील सर्व पदाधिकारी आजी-माजी मनसैनिक अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी यांनी प्रचार रॅलीत सहभागी होण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार डॉ. अनुज पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यालया जवळ सकाळी आठ वाजून ३० मिनिटांनी उपस्थित राहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.