जळगाव, (प्रतिनिधी) : शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी रविवारी गेंदालाल मिल भागातील तक्षशिला बुद्ध विहार येथे भेट दिली. भाऊबीज सणानिमित्त भगिनींनी राजूमामांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली.
गेंदालाल मिल भागातील ३५८ ग्रुपचे संस्थापक आयोजक अजय गरुड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगरसेवक राजू मराठे, संजय शिंदे, विनय चौधरी यांच्यासह अनेक महिला, पुरुष उपस्थित होते. रविवारी भाऊबीज सण असल्यामुळे महिला भगिनींनी राजूमामांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी तक्षशिला बुद्ध विहार येथे भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करून राजूमामा भोळे यांनी अभिवादन केले. प्रसंगी स्थानिक प्रश्नांवर नागरिकांनी आ. राजूमामा भोळे यांच्याशी संवाद साधला. आपल्या भागातील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.