पारोळा (प्रतिनिधी) : तालुक्यातील पारोळा-एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांनी उंदिरखेडे, उडणीदिगर, मोंढाळे प्र.ऊ., तरडी, टोळी, पिंप्री प्र.ऊ., मुंदाणे प्र.अ., सोके, शेवगे प्र.ब., वसंतवाडी येथे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या भेटी घेत संवाद साधला.
यावेळी नागरिकांनी अमोल पाटील यांच्या पाठीशी उभे राहून महायुतीला मतदान करणार असल्याची ग्वाही दिली. प्रसंगी अमोल पाटील यांनी उंदिरखेडे, उडणीदिगर, मोंढाळे प्र.ऊ., तरडी, टोळी, पिंप्री प्र.ऊ., मुंदाणे प्र.अ., सोके, शेवगे प्र.ब., वसंतवाडी येथे प्रचार दौरा केला. विकासकामांसाठी पुन्हा एकदा संधी देऊन अमोल पाटील यांच्या पाठीशी राहण्याचे भावनिक आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी केले. ग्रामस्थांना वंदन करून भेटी-गाठी घेत अमोल पाटील यांनी जेष्ठांकडुन शुभाशिर्वाद घेतले.